Thursday, 29 April 2021

भिकारी आणि राजयोग

आचार्य विराज सूर्यकांत

एका गावात एक भिकारी राहत होता. अनेक वर्षे तो भीक मागून खात असे अन् गावाच्या मंदिराच्या पारावर झोपत असे.

एक दिवस एक जाणकार संन्यासी प्रवास करीत असताना त्या गावात आला. भिकाऱ्याला पाहताच त्याला धक्का बसला. भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर राजयोग होता. खरे तर तो राजा व्हायला हवा होता. पण तो भीक मागत होता. संन्याशाने खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कारण सापडलेच नाही. क्षणभर त्याला वाटले, आपली विद्या चुकीची असावी, नाही तर शरिरावर राजचिन्हे असलेला माणूस असा भीक का मागेल? 

तो संन्यासी आपल्या पुढील प्रवासावर जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे म्हणून तो मंदिरात गेला. तर त्याला पारावर भिकारी झोपलेला दिसला.  भिकाऱ्याने झोपेत दोन्ही पायांची अढी घातलेली होती. संन्याश्याने त्याच्या जवळच्या दंडाने भिकाऱ्याच्या पायावर जोरदार प्रहार केला. प्रहार इतका जोरात होता की, भिकाऱ्याचे दोन्ही पाय जखमी झाले. 
 
भिकारी ओरडून उठला आणि संन्याशाशी भांडू लागला. संन्याशी त्याला म्हणाला,  तुझ्या शरिरावर राजचिन्हे आहेत. तू इतक्या दिवसांत राजा व्हायला हवा होतास. पण, पायाची अढी घालून झोपतोस, म्हणून तुझा राजयोग अडकून पडलाय.’ भिकाऱ्याला विश्वास बसला नाही. पण एक झाले, पाय जखमी झाल्यामुळे त्याला झोपताना पायांची अढी घालता येईना. अढी घालण्याची सवय असल्यामुळे त्याला झोपही येईना. तो रात्रभर जागाच राहिला. 

त्या राज्याचा राजा मध्यरात्री एकटाच मंदिरात येऊन पुजा करून जात असे. त्या रात्रीही राजा पुजा करायला आला. त्याचवेळी राजाच्या शत्रूंनी त्याला मारण्याचा कट रचलेला होता. काही मारेकऱ्यांनी राजावर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात पारावर झोपलेला भिकारी जागाच होता. त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने झटकन पुढे होऊन राजाला वाचविले. राजाचे प्राण वाचले. खुष झालेल्या राजाने त्याला आपले अर्धे राज्य आणि राजकन्या भिकाऱ्याला दिली. आणि त्याचा राजयोग सिद्ध झाला. 

Moral Of The Story : अज्ञानामुळे आपल्या भाग्याची दारे बंद होतात. जाणते ती आपल्यासाठी उघडू शकतात



Friday, 18 December 2020

Why Swami Vivekananda had to treat Sister Nivedita harshly (he was committed to celibacy)

Why Swami Vivekananda had to treat Sister Nivedita harshly (he was committed to celibacy)
‘It was his way of defending himself and her from the passionate adoration she had for him.’



However, it was not as the gentle Sistine Child that Vivekananda appeared to Nivedita. This was a period that Nivedita herself described as one of “clash and conflict...I had been little prepared for that constant rebuke and attack upon all my most cherished prepossessions which was now my lot. Suffering is often illogical and I cannot attempt to justify by reason the degree of unhappiness which I experienced at this time as I saw the dream of a friendly and beloved leader falling away from me, and the picture of one who would be at least indifferent, and possibly silently hostile, substituting itself instead”.

There is no doubt that Vivekananda suffered equally from deep emotional turmoil and a sense of helplessness when he saw the vulnerability of his spontaneous, ebullient, adoring disciple with her flashing Irish eyes. Perhaps the harshness with which he tried to impose a moral discipline on Nivedita was his way of defending himself and her from the passionate adoration she had for him. As Josephine was to later analyse, “Although Nivedita’s feelings for him were always absolutely pure, he perhaps saw their danger.”

Vivekananda tried to do two things, harshly and precipitously.

One, he urged her, “You have to forget your own past and cause it to be forgotten. You have to lose even its memory.” Nivedita, who still considered herself as “the most loyal English woman that ever breathed in this country,” felt “I cannot yet throw any of my past experience of human life and human relationships overboard”.

In fact, she confessed, “It is the dream of my life to make England and India love each other.” It was only later, once she became aware of the extent of British racial arrogance and the unfair discriminatory policies they practised against Indians that she adopted India completely and spoke for its people as one of her own. But that took some time.

The second attempt of Vivekananda was to point out aspects of her behaviour, such as constant expressions of feeling, whether of pain, admiration or surprise, which to him seemed “shocking” and “ill- bred”. She needed, he felt, to learn reserve, reticence and be reflective in meditative silence. Perhaps he saw the sharp contrast between the shyness and withdrawn demeanour of Bengali women with Nivedita’s outspoken, often argumentative personality.

He advised her to “Hinduise” her thoughts, needs, conceptions and habits since “your life, internal and external, has to become all that an orthodox Hindu Brahmin brahmacharini’s ought to be”. The decision to embrace the life of a celibate, he pointed out, came with a strict lifestyle. Vivekananda confessed that “shadows of home and marriage cross your mind sometimes. Even to me they come now and again!” But he had steeled himself to accept brahmacharya, the vows of celibacy, which meant renunciation of private pleasure for public good. In his conception, true manhood could not be without the control of manhood. Therefore, Nivedita realised, to him marriage would be the first of crimes.

“To rise beyond the very memory of its impulse was his ideal and to guard himself and his disciples against the remotest danger of it, his passion. The very fact of ‘un-marriedness’ counted with him as a spiritual asset.” But as Nivedita also understood, Vivekananda’s dread was not of women but of temptation. Many of his disciples and co-workers the world over were women but he sought to give each of them the title of a family relationship – whether of sister, mother or daughter.
What had particularly thrilled him in America was the ease with which women played men’s sports, studied the same disciplines at university since knowledge has no sex and were free to choose their own marriage partners.

In India, he realised that marriage by arrangement had inflicted much pain on many but hoped that examples from the West would indicate other possibilities. The ideal marriage in Vivekananda’s view was one where there would be man’s acceptance of his wife as the mother, as he had seen in the case of his master Ramakrishna.

It goes to Nivedita’s credit that she withstood Vivekananda’s harsh discipline, although she did have emotional breakdowns from time to time, when she was comforted by Mrs Bull and Josephine. At the end, she could admit, “I understood, for the first time, that the greatest teachers may destroy in us a personal relation in order to bestow the Impersonal Vision in its place.” Reflecting on this relationship, Romain Rolland was to write,

The future will always unite her name of initiation Sister Nivedita to that of her beloved Master...as St Clara to that of St Francis, although of a truth the imperious Swami was far from possessing the meekness of the Poverello and submitted those who gave themselves to him, to heart-searching tests before he accepted them. But her love was so deep; Nivedita did not keep in her memory his harshness – only his sweetness.

Many years later, Romain Rolland analysed that the harshness with which Vivekananda often treated Nivedita was his own way of defending himself against her “worshipful passion”. Perhaps Nivedita had for Vivekananda a “lover’s adoration”, similar to what Madeleine Slade was to have for Gandhi, but the age difference between Gandhi and Slade was thirty years as against the five years between Vivekananda and Nivedita. Rolland concluded that although “the sentiment of Nivedita had always been one of absolute purity maybe Vivekananda understood the danger”.

The summer tour of Swamiji began on 11 May 1898 when he boarded the train at Calcutta’s Howrah station with a large group of disciples. They were headed to Kathgodam, at the foothills of the Himalayas, from where they would proceed by trekking and riding on horseback to Nainital and then further along the scenic mountain route towards Almora. On the train journey, which lasted for two nights and a day, Swamiji gave a running commentary on the diversity of Indian culture and history as the train went through various cities and changing terrain. The wealth of information and experience gathered by Nivedita was to find expression later in her many writings, from travelogues to mythological tales, descriptions of history and architecture to serious analysis of the Indian societal framework.

She began to spin the “web of Indian life” (as one of her most well-known books came to be named) from the word pictures that the Swamiji lovingly painted for them. Nivedita was to reflect, “The summer of 1898 stands out in my memory as a series of pictures, painted like old altar-pieces against a golden background of religious ardour and simplicity, and all alike glorified by the presence of one who, to us in his immediate circle, formed their central point.”

Excerpted with permission from Margot: Sister Nivedita of Vivekananda, Reba Som, Viking, Penguin Random House India.

Source : https://scroll.in/article/843129/why-swami-vivekananda-had-to-treat-sister-nivedita-harshly-he-was-committed-to-celibacy

Tuesday, 15 December 2020

हस्तिनी

-आचार्य विराज सूर्यकांत

हस्तिनी लक्षणांनी युक्त स्त्रिया सर्वश्रेष्ठ समजल्या जातात. त्या दुर्लभ असतात. लाखातून एखादी स्त्री हस्तिनी लक्षणांनी युक्त असते.
हस्तिणी स्त्रियांना गजगामिनी असेही म्हटले जाते. हस्ती म्हणजे हत्ती. गजगामिनी म्हणजे हत्तीसारखी डौलदार चाल असलेली. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व नर हत्तीकडे नसून मादीकडे असते. कळपातील सर्वाधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान हत्तीण कळपाचे नेतृत्व करते. यावरून या प्रकारातील स्त्रियांना हस्तिनी हे नाव मिळाले आहे.
भारतीय संस्कृतीत हत्ती हे संपत्ती, बुद्धी, शक्ती आणि नेतृत्व अशा अनेक सर्वश्रेष्ठ गोष्टींचे प्रतीक आहे. हस्तिणी स्त्रियाही या सर्व गुणांत श्रेष्ठ असतात.

अमर्याद संपत्तीला गजांतलक्ष्मी असे म्हटले जाते. लक्ष्मीच्या मूर्ती आणि फोटोत दोन्ही बाजूंना सोन्याच्या मोहरा ओतणारे हत्ती असतात, ते याचमुळे. हस्तिणी स्त्रिया अशाच धनधान्य संपन्न असतात. त्यांच्या हातातील लक्ष्मी खंडत नाही. हत्तीचे शिर असलेला गणपती जसा चतूर आणि नेतृत्वात श्रेष्ठ आहे, तशाच हस्तिणी स्त्रियाही असतात. त्यांच्यात कमालीचे नेतृत्व गुण असतात. त्या महत्त्वाकांक्षी असतात. प्रसंगी त्या युद्धही करू शकतात. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा अशी सर्वश्रेष्ठ हस्तिणी होती.

हस्तिनी स्त्रियांचा बांधा भरदार आणि मजबूत असतो. प्रकृती निरोगी असते. हस्तिणी स्त्रियांचे कपाळ भव्य असते. नासिका मध्यम स्वरूपाची, ओठे मोठे, कान किंचित जाडसर आणि रुंद, चेहरा कानशिलापर्यंत रुंद आणि हनुवटी किंचित पुढे आलेली असते. डोळे बारीक ते मध्यम आकाराचे. केस संभार भरपूर असतो. वक्ष मोठे आणि उन्नत असतात. बेंबीच्या आजूबाजूचा भाग पुढे आलेला असल्यामुळे बेंबी खोलगट दिसते. योनीचा आकार फार लांबट नसून किंचितसा रुंद असतो.

हस्तिनी स्त्रीयांची प्रकृती राजस प्रकारातील असते. राजस म्हणजे राजेशाही थाट आवडणारी. हस्तिनी स्त्रिया सतत हसतमुख असतात. ऐषोआराम आणि भोग विलासाची त्यांना मनापासून आवड असते. सुखासीन आयुष्याची आवड असल्यामुळे हस्तिणी स्त्रिया दरिद्री पुरुषांसोबत राहू शकत नाहीत. हस्तिनी स्त्रियांना सांभाळण्यासाठी पुरुष तालेवारच हवेत.

हस्तिणी स्त्रिया जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतात. त्यांचा स्वभाव निश्चिंत असतो. त्या कसलीच घाई करीत नाहीत. शांतपणाने मन लावून कामे करतात. संभोगातही त्यांची हीच वृत्ती दिसून येते. त्यांना दीर्घकाळ चालणारा संभोग आवडतो.

राजस वृत्ती असल्यामुळे त्यांना लवकर राग येत नाही, पण मनाविरुद्धची कोणतीच गोष्ट त्या सहन करीत नाहीत. मनाविरुद्ध काही घडल्यास त्या क्रोधित होतात. नवरा हुकूम सोडणारा असल्यास त्यांचे नवऱ्याशी सतत वाद होतात.

हस्तिणी स्त्रियांना कोणाचे आदेश ऐकायला आवडत नाही. त्यांना स्वतःच हुकूम सोडायला आवडते. कुटुंबात आपलाच शब्द त्या चालवतात. राजसत्ता हाती आल्यास, त्या हुकूमशाही पद्धतीने राज्य करतात. कोणाचेही ऐकत नाहीत. स्वत:चेच बरे-वाईट निर्णय सर्वांवर लादतात.

स्त्रियांची १० लक्षणे अथवा प्रकार

-आचार्य विराज सूर्यकांत

प्राचीन भारतीय सौंदर्य शास्त्रानुसार स्त्रियांचे १० प्रकार  आहेत. (काही लोक ११ प्रकारही मानतात.) शारिरिक गुणवैशिष्ट्ये, स्वभाव वैशिष्ट्ये, आणि गुण व भाग्य लक्षणे यावरून हे प्रकार ठरविले गेले आहेत.

१. हस्तिनी (गजगामिनी)
२. पद्मिनी,
३. शंखिनी
४. चित्रिनी
५. आतुरिनी (आतुरा)
६. डाकिनी
७. प्रेमिनी
८. कृपिनी
९. स्वर्गिनी
१०. बहुवंशिनी
.. .. .. .. ..


Saturday, 21 November 2020

कथाचोर नागराज मंजुळे अखेर अडकले!

‘झुंड’वरील बंदी उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित व महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला चित्रपटाच्या प्रदर्शनास तेलंगना उच्च न्यायालयाने बंदी घातली असून ही बंदी उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘झुंड’साठी दुसऱ्याची कथा चोरल्याचा आरोप नागराजवर करण्यात आला आहे. याआधी ‘सैराट’ चित्रपटाची कथाही नागराज यांनी अशाच प्रकारे ढापल्याचा आरोप नागराज यांच्यावर आहे. ‘सैराट’चे कथाचोरीचे प्रकरण दबले होते. ‘झुंड’च्या वेळी मात्र नागराज अण्णा अडकले आहे.

नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता. या व्यक्तीच्या मते ‘झुंड’ चित्रपटाची कथा त्यांच्या कथेची नक्कल आहे. हा दावा ‘झुंड’च्या निर्मात्यांनी फेटाळून लावला होता. नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगना उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दावा मान्य करून ‘झुंड’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.


या बंदी विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. शरद बोबडे, न्या. के. एस. बोपन्ना आणि व्ही. रामा सुब्रमण्यम यांच्या निरिक्षणाखाली हे प्रकरण कोर्टात सुरु होते. या तीन सदस्यीय न्यायपीठाने ‘झुंड’ चित्रपटाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी देखील तेलंगना उच्च न्यायालयाच्या बंदीस मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवल्यामुळे ‘झुंड’चे प्रदर्शन आणखी काही काळ लांबणार आहे. या वादावादीमुळे चित्रपटाची प्रसिद्धी मात्र फुकटात होत आहे. याचा फायदा अर्थातच कथा चोर अण्णालाच होणार आहे.

सैराटचे प्रकरण दबले 
नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा नाथ माने यांच्या 'बोभाटा' या कादंबरीवरुन चाेरली होती. २०१६ मध्ये नाथ माने यांनी पनवेल कोर्टात मंजुळेंविरुद्ध खटला दाखल केला होता. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची विनंती नाथ मानेंनी न्यायालयास केली होती. तथापि, हे प्रकरण न्यायालयात तसेच पडून राहिले. वरच्या कोर्टात जाण्यासाठी लागणारा अमाप पैसा नाथ माने यांच्याकडे नव्हता. त्यामुळे माने यांच्यावरचा अन्याय तेव्हा दडपला गेला.


माने हे तेव्हा कामोठे परिसरात राहत होते. ते मूळचे साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. २०१० मध्ये त्यांनी 'बोभाटा' कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.
नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांनी माने यांची कथाच ढापून घेतली. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर माने यांना धक्का बसला. ‘सैराट’ फ्रेम-टू-फ्रेम ‘बोभाटा’ कादंबरीवर बेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. कादंबरीतील बहुतांश संवादही चित्रपटात जशास तसे उचलण्यात आले आहेत.

‘सैराट’ पाहिल्यानंतर नाथ माने झी आणि एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार इमेलद्वारे संपर्क साधला. तथापि, त्यांना कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावले. पण, त्यांचे दुर्दैव तेथेही त्यांच्या आड आले. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही.

नाथ माने यांना योग्य साथ मिळाली असती, तर नागराज मंजुळे यांच्या वाङमय चौर्याच्या कारवायांचा तेव्हाच भंडाफोड झाला असता. तथापि, मंजुळे यांचे दैव तेव्हा बलवत्तर होते. न्यायालयाने नाथ माने यांच्या तक्रारीची योग्य प्रकारे दखल न घेतल्यामुळे मंजुळे यांचे तेव्हा फावले. यावेळी मात्र मान सोडवून घेणे मंजुळे अण्णास सोपे नाही. यानिमित्ताने भारतीय न्याय व्यवस्था मोठ्यांसाठीच कशी काम करते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गरिबांना न्याय देण्यास आपली यंत्रणा खरोखर हलेल तो सुदीन.

सततच्या कथा चोरीच्या आरोपांमुळे नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’च्या चित्रपटाच्या कथेवरही संशय व्यक्त होत आहे. ही कथाही मंजुळे यांनी चोरलेली नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.

Thursday, 3 September 2020

पत्रकारांच्या जीवाची किंमत सासान्य माणसाच्या जीवापेक्षा अधिक आहे का?

‘टीव्ही नाईन’चे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणीही करण्यात येत आहे. कोरोनाने मरणारे रायकर हे देशातील एकटेच व्यक्ती आहेत काय? या क्षणापर्यंत (३ सप्टेंबर २0२0) देशात ६७ हजारांपेक्षा जास्त, तर महाराष्ट्रात २४ हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाने मरण पावले आहेत. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रोज लोक मरत आहेत. रायकरांच्या मरणाचे मोल या सर्वांपेक्षा जास्त आहे काय? चौकशीच करायची असेल, तर या सर्वांच्या मृत्यूची करा. भरपाई द्यायची असेल तर सर्वांनाच द्या.  लोकशाहीत प्रत्येकाच्या जीवाची किंमत एक समान असली पाहिजे. माणूस पत्रकार झाला म्हणून जीवाची किंमत वाढते, आणि शेतकरी झाला म्हणून कमी होते, असे काही आहे काय?

बरे या पत्रकारांनी मागील आठ-नऊ महिन्यांच्या कोरोनाच्या काळात समाजाला उपयोगी पडणारे काही मोठे कार्य केले आहे, असेही नव्हे. कोरोनाने रोज माणसे मरत असताना यांनी मोदी सरकारची गुलामीच केली. लोकांच्या औषध-पाण्याचे विषय कधी लावून धरले नाहीत. मोदींच्या इशाºयावर थाळ््या-टाळ््या, दिवे यांचे महोत्सव साजरे केले. गेले महिनाभर तर सुशांतसिंग राजपूतशिवाय दुसरा विषय यांच्या चॅनलवरून दिसत नव्हता. यासाठी तुम्हाला भरपाई हवी आहे का?

रायकर यांना व्हेंटिलेटर मिळाले नाही, म्हणून रडणाºया हरामखोरांनो, मागील आठ-नऊ महिन्यांपासून व्हेंटिलेटर अभावी रोज लोक मरत आहेत, पण तुम्ही कधी त्यांचा विषय तुमच्या चॅनलवर लावला नाही. तेव्हा तुम्ही सुशांतसिंग केसला हवा देत होता. दुस-यांच्या घरात तरुण मुले मरत होते, तेव्हा तुम्ही थाळ्या-टाळ्याचे कव्हरेज करण्यात मशगुल होता. आता तुमचा एक माणूस गेला तर गळे काढताय काय?

शेजा-याच्या घरातील आग आपल्या घरातही येऊ शकते, याचे भान तुम्हाला राहिले नाही. आता रडू नका. हे तुमच्याच पापाचे फळ आहे.

Friday, 17 August 2018

वाईट पक्षात ढोंगी माणूस

अटलबिहारी वाजपेयी यांचे वर्णन करताना मीडिया "वाईट पक्षात चांगला माणूस" असे विशेषण वापरतो. पण ते बिलकूल खरे नाही. अगदी साफ खोटे आहे. वाजपेयी यांचे योग्य वर्णन करायचे झाल्यास "वाईट पक्षात ढोंगी माणूस" असे करावे लागेल. 

अयोध्या प्रकरण
भाजपाचा कथिल पुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यासाठी आंदोलन सुरू केले, तेव्हा वाजपेयी या आंदोलनापासून दूर राहिले. या आंदोलनाला वाजपेयींचा विरोध आहे, असा संदेश देशात जावा यासाठी हे नाटक करण्यात आले. या आंदालनाची परीणती अयोध्येतील मशिद पडण्यात झाली. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी यांनी अडवाणी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. बाबरी मशीदविराधी आंदोलनाला वाजपेयींचा खरेच विरोध होता, तर वाजपेयींनी या आंदोलनाला जाहीर विरोध करायला हवा होता. तसेच अडवाणींनासुद्धा जाहीर समज द्यायला हवी होती. पण तसे काहीही झाले नाही. उलट वाजपेयी हे अडवाणींच्या रथावर स्वार झाले. अयोध्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन पुढे वाजपेयी या देशाचे पंतप्रधानही बनले. 


टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन
वार्ताहर कृष्णकुमार सिंग


अयोध्येकडे निघालेली लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडविण्याचे धाडस तेव्हाचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दाखविले. अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये आली तोपर्यंत संपूर्ण देशातील वातावरण तापलेले होते. बिहारातही तीच स्थिती होती. अडवाणी समस्तीपूर येथील सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. संघोटे (संघोटे म्हणजे संघवाले. माझे स्नेही रविन्द्र तहकिक यांनी या शब्दाची निर्मिती केली आहे. लंगोटे तसे संघोटे.) रस्त्यावर उतरून धिन्गाणा घालित होते. जळते टायर फेकत होते. अल्पसंख्याक समाजही विरोध करीत होता. वातावरण अत्यंत प्रक्षोभक बनले होते. अशा स्थितीत लालूंनी अडवाणींच्या अटकेचे आदेश दिले. २३ ऑक्टोबर १९९० रोजी पहाटे कथिल पुरुषास अटक करण्यात आली तसेच ताबडतोब हेलिकॉप्टरद्वारे मासन जोरे येथे हलविण्यात आले. मासन जोरे शहर आता झारखंडमध्ये आहे. तेव्हा झारखंड राज्याची निर्मिती झालेली नव्हती. हा भाग बिहारातच होता. विशेष म्हणजे अडवाणी यांची रथयात्रा अडविण्यासाठी आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही मोठी भूमिका बजावली होती. अडवाणी यांना अटक करण्यासाठी नितीशकुमार हे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिन्ग यांच्यावर सतत दबाव टाकीत होते. अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर चांगला प्रकाश टाकला आहे. (निवृत्त झालेले सिन्ग हे आता ब्लॉग लिहितात. त्याची लिंक अशी आहे : http://kksingh1.blogspot.com/)

गुजरात दंगल
वाजपेयींचे मोठेपण सांगण्यासाठी मीडियावाले दुसरे उदाहरण गुजरात दंगलीचे देतात. गोध्रा कांडानंतर उसळलेल्या मुस्लिमविरोधी दंगलीत ३ हजारांपेक्षाही जास्त मुस्लिमांना ठार मारण्यात आले. ही दंगल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच पुरस्कृत केली होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी! जनाच्या लाजं काजं वाजपेयी यांनी गुजरातच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. ४ एप्रिल २००० रोजी त्यांनी अहमदाबादेतील शाह आलम भागातील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. या छावणीत दंगलीमुळे घरदार सोडावे लागलेल्या मुस्लिमांना ठेवण्यात आलेले होते. या छावणीला भेट दिली तेव्हा वाजपेयी म्हणाले : "माझी मान शरमेने खाली झुकली आहे. हजारो लोकांना आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले आहे. मी लवकरच काही मुस्लिम देशांचा दौरा करणार आहे. तेथे गेल्यानंतर मला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, हे मला माहीत नाही." याच दौ-यात वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, "राजधर्म का पालन करो. राजा के लिए प्रजा-प्रजा मे कोई भेदभाव नही होना चाहीए." वाजपेयींचे हे वाक्य फारच गाजले. वाजपेयी कसे चांगले आहेत, हे सांगण्याची मीडियामध्ये जोरदार स्पर्धा लागली. पण प्रश्न असा आहे की, स्वत: वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन केले का? गुजरातमधील दंगलग्रस्त मुस्लिमांना न्याय दिला का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ठार मारण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल वाजपेयींना खरेच कळवळा होता, तर वाजपेयी यांनी सर्वप्रथम मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हाकलायला पाहिजे होते. इतकेच नव्हे, तर गुजरातेत राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. पण यातले काहीही त्यांनी केले नाही. गुजराती मुस्लिमांना आजही न्याय मिळाला नाही. वाजपेयींनी ठरविले असते, तर मुस्लिमांना न्याय नक्की मिळाला असता. पण वाजपेयी नेहमीप्रमाणे ढोंगीपणाने वागले. नुसतेच बोलले. केले काही नाही. 

वाजपेयींनी भाजपा का सोडला नाही?
वाजपेयींचा बाबरी मशीद पाडण्यास विरोध होता. वाजपेयींचा गुजरात दंगलीला विरोध होता, हे एक वेळ खरे मानून चालू या! हे खरे मानले, तर मग प्रश्न असा पडतो की, वाजपेयी आयुष्यभर भाजपात का राहिले? बाबरी मशीद पाडल्यामुळे देशाची मानसिक फाळणी झाली. दंगलींचा आगडोंब उसळला. दहशतवादाला वाढावा मिळाला. गुजरात दंगलींनी देशाच्या कपाळावर अमानुषतेचा कलंक लागला. या घटनांनी कोणताही सुहृदय माणूस हेलावून गेला असता. वाजपेयी हेलावले असते, तर त्यांनी त्याचक्षणी भाजपाला राम राम ठोकला असता. पण वाजपेयी बुडाला डिन्क लावल्याप्रमाणे खुर्चीला घट्ट चिकटून राहिले. 

वाजपेयी यांचा हा सर्व दांभिकपणा सुरू असताना अत्रे असते तर काय झाले असते? अत्रे म्हणाले असते : अरे हा कसला अटल बिहारी हा तर अट्टल ढोंगी आहे. याच्यासारखा ढोंगी माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढील १० हजार वर्षांत होणार नाही.