Tuesday, 15 December 2020

हस्तिनी

-आचार्य विराज सूर्यकांत

हस्तिनी लक्षणांनी युक्त स्त्रिया सर्वश्रेष्ठ समजल्या जातात. त्या दुर्लभ असतात. लाखातून एखादी स्त्री हस्तिनी लक्षणांनी युक्त असते.
हस्तिणी स्त्रियांना गजगामिनी असेही म्हटले जाते. हस्ती म्हणजे हत्ती. गजगामिनी म्हणजे हत्तीसारखी डौलदार चाल असलेली. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व नर हत्तीकडे नसून मादीकडे असते. कळपातील सर्वाधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान हत्तीण कळपाचे नेतृत्व करते. यावरून या प्रकारातील स्त्रियांना हस्तिनी हे नाव मिळाले आहे.
भारतीय संस्कृतीत हत्ती हे संपत्ती, बुद्धी, शक्ती आणि नेतृत्व अशा अनेक सर्वश्रेष्ठ गोष्टींचे प्रतीक आहे. हस्तिणी स्त्रियाही या सर्व गुणांत श्रेष्ठ असतात.

अमर्याद संपत्तीला गजांतलक्ष्मी असे म्हटले जाते. लक्ष्मीच्या मूर्ती आणि फोटोत दोन्ही बाजूंना सोन्याच्या मोहरा ओतणारे हत्ती असतात, ते याचमुळे. हस्तिणी स्त्रिया अशाच धनधान्य संपन्न असतात. त्यांच्या हातातील लक्ष्मी खंडत नाही. हत्तीचे शिर असलेला गणपती जसा चतूर आणि नेतृत्वात श्रेष्ठ आहे, तशाच हस्तिणी स्त्रियाही असतात. त्यांच्यात कमालीचे नेतृत्व गुण असतात. त्या महत्त्वाकांक्षी असतात. प्रसंगी त्या युद्धही करू शकतात. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा अशी सर्वश्रेष्ठ हस्तिणी होती.

हस्तिनी स्त्रियांचा बांधा भरदार आणि मजबूत असतो. प्रकृती निरोगी असते. हस्तिणी स्त्रियांचे कपाळ भव्य असते. नासिका मध्यम स्वरूपाची, ओठे मोठे, कान किंचित जाडसर आणि रुंद, चेहरा कानशिलापर्यंत रुंद आणि हनुवटी किंचित पुढे आलेली असते. डोळे बारीक ते मध्यम आकाराचे. केस संभार भरपूर असतो. वक्ष मोठे आणि उन्नत असतात. बेंबीच्या आजूबाजूचा भाग पुढे आलेला असल्यामुळे बेंबी खोलगट दिसते. योनीचा आकार फार लांबट नसून किंचितसा रुंद असतो.

हस्तिनी स्त्रीयांची प्रकृती राजस प्रकारातील असते. राजस म्हणजे राजेशाही थाट आवडणारी. हस्तिनी स्त्रिया सतत हसतमुख असतात. ऐषोआराम आणि भोग विलासाची त्यांना मनापासून आवड असते. सुखासीन आयुष्याची आवड असल्यामुळे हस्तिणी स्त्रिया दरिद्री पुरुषांसोबत राहू शकत नाहीत. हस्तिनी स्त्रियांना सांभाळण्यासाठी पुरुष तालेवारच हवेत.

हस्तिणी स्त्रिया जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगतात. त्यांचा स्वभाव निश्चिंत असतो. त्या कसलीच घाई करीत नाहीत. शांतपणाने मन लावून कामे करतात. संभोगातही त्यांची हीच वृत्ती दिसून येते. त्यांना दीर्घकाळ चालणारा संभोग आवडतो.

राजस वृत्ती असल्यामुळे त्यांना लवकर राग येत नाही, पण मनाविरुद्धची कोणतीच गोष्ट त्या सहन करीत नाहीत. मनाविरुद्ध काही घडल्यास त्या क्रोधित होतात. नवरा हुकूम सोडणारा असल्यास त्यांचे नवऱ्याशी सतत वाद होतात.

हस्तिणी स्त्रियांना कोणाचे आदेश ऐकायला आवडत नाही. त्यांना स्वतःच हुकूम सोडायला आवडते. कुटुंबात आपलाच शब्द त्या चालवतात. राजसत्ता हाती आल्यास, त्या हुकूमशाही पद्धतीने राज्य करतात. कोणाचेही ऐकत नाहीत. स्वत:चेच बरे-वाईट निर्णय सर्वांवर लादतात.

No comments:

Post a Comment