आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री संदीप कुमार यांचा एक सेक्स व्हिडिओ नुकताच उजेडात आला. त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिमंडळातून आणि आम आदमी पार्टीतून त्यांची हकालपट्टी झाली. आम आदमी पार्टीचे एक नेते तथा माजी पत्रकार आशतोष यांनी या निमित्ताने भारतीय राजकारणातील नेते आणि स्त्रीसंबंधांवर एक ब्लॉग लिहिल्याने नवा भूकंप झाला आहे. आशुतोष यांनी पं. नेहरू यांच्या पासून अटलविहारी वाजपेयी यांच्यापर्यंत साºयांचीच अंडीपिल्ली बाहेर काढली आहेत. आशुतोष यांचा लेख इंग्रजीत आहे. त्याचा थोडक्यात मराठी गोषवारा असा :
पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे आपल्या अनेक महिला सहकाºयांसमवेत संबंध असल्याच्या चविष्ट चर्चा होत आल्या आहेत. त्यांचे एडविना माउंटबॅटन यांच्या सोबतच्या संबंधांवर नेहमीच चर्चा होत आली. नेहरूंच्या मृत्यूपर्यंत दोघांतील प्रेमभाग कायम होता. १९१0 च्या दशकात महात्मा गांधी यांनी सरला चौधरी यांना आपली अध्यात्मिक पत्नी मानले होते. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कस्तुरबा गांधीही चिंतित झाले होते. सरला चौधरी रविंद्रनाथ टागोर यांच्या नात्यातील होत्या. सी. राजगोपालचारी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकून सरला चौधरी यांना गांधीजींपासून दूर होण्यास भाग पाडले. आपल्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगात गांधीजी आपल्या दोन तरुण भाच्यांसोबत (की पुतण्या) नग्न झोपत असत. नेहरूंनी असे करू नका, असा सल्ला त्यांना दिला. पण गांधी बधले नाहीत.
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी आपल्या एका महिलेला विवाह न करताच जीवनसाथी बनविले. दोघे आयुष्यभर एकत्र राहिले. त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नाडिस यांनी लैला कबीर यांच्याशी लग्न केले. पण जया जेटली यांच्या सोबतही त्यांची जीवनभर मैत्री राहिली. भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘आपण अविवाहित आहोत, ब्रह्मचारी नव्हे’ असे संसदेतच सांगितले होते. ते आपल्या एका महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत उघडपणे एकत्र राहत होते. या नेत्यांचे महिलांसोबतचे संबंध त्यांच्या राजकीय जीवनात अडसर ठरले नाहीत. कारण ते बडे नेते होते. आम्ही बच्चे आहोत, म्हणून आमच्याकडे बोट दाखविले जात आहे. पण लक्षात ठेवा, बच्चे लोकच काळाचा प्रवाह बदलून इतिहास घडवित असतात.
( आशुतोष यांचा हा ब्लॉग एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. त्यावरून आता राष्टÑीय महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. या ब्लॉगमध्ये चीनचे नेते माओ त्से तुंग यांच्या स्त्रीलंपटपणाचे खळबळजनक किस्से दिले आहेत.)