सुहास भुसे
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात दोन महान उड्या आहेत. सोन्याची अक्षरे करून लिहिल्या तरी त्यांचे मोल होणार नाही.

पहिली उडी #वसंतदादा पाटलांची..
सांगलीतील गणेशदुर्गाच्या तुरुंगाच्या तटावरून दादा व त्यांच्या 14 सहकाऱ्यांनी पोलिसांच्याच बंदुका पळवुन थेट खंदकात उड्या मारल्या..पोलिसांनी गोळीबाराच्या फैरी झाडत दादांचा भर बाजारातून चित्तथरारक पाठलाग केला ज्यात दादांचे 2 सहकारी हुतात्मा झाले. पळत पळत कृष्णेवरील पुलावर आले असताना दादा व त्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी क्षणाचाही विचार न करता वंदे मातरम म्हणत पुलावरून रो रो रोरावणाऱ्या कृष्णेच्या महापुरात 40 फुटांवरून उड्या ठोकल्या. गोळ्यांचा पाऊस सुरूच होता त्यात स्वतः दादा खांद्यावर गोळी लागून जखमी झाले.
वसंतदादांची ही उडी आणि हे तुरुंग फोडून पलायन एखाद्या साहसी हॉलिवूडपटात शोभेल असेच आहे. ग्रेट एस्केप किंवा वन द्याट गॉट अवे आठवत असेलच ...

आणि दुसरी उडी पद्मभूषण #नागनाथ_अण्णा नाईकवडी यांची..
अण्णांनी वसंतदादांच्या साहसापासून प्रेरणा घेत सातारचा सेलुलर जेल फोडला. आणि तटावरुन उडी मारून, हा अभेद्य समजला जाणारा सातारा जेल फोडून, ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन यशस्वी पलायन केले.

...इतिहास निर्माण करणारे आणि इतिहास लिहिणारे वेगवेगळे असल्याने या दोन चित्तथरारक उड्या 'त्रिखंडात' गाजल्या नाहीत.!
(Suhas Bhuse यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

No comments:
Post a Comment