Friday, 17 August 2018

वाईट पक्षात ढोंगी माणूस

अटलबिहारी वाजपेयी यांचे वर्णन करताना मीडिया "वाईट पक्षात चांगला माणूस" असे विशेषण वापरतो. पण ते बिलकूल खरे नाही. अगदी साफ खोटे आहे. वाजपेयी यांचे योग्य वर्णन करायचे झाल्यास "वाईट पक्षात ढोंगी माणूस" असे करावे लागेल. 

अयोध्या प्रकरण
भाजपाचा कथिल पुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यासाठी आंदोलन सुरू केले, तेव्हा वाजपेयी या आंदोलनापासून दूर राहिले. या आंदोलनाला वाजपेयींचा विरोध आहे, असा संदेश देशात जावा यासाठी हे नाटक करण्यात आले. या आंदालनाची परीणती अयोध्येतील मशिद पडण्यात झाली. या संपूर्ण प्रकरणात वाजपेयी यांनी अडवाणी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. बाबरी मशीदविराधी आंदोलनाला वाजपेयींचा खरेच विरोध होता, तर वाजपेयींनी या आंदोलनाला जाहीर विरोध करायला हवा होता. तसेच अडवाणींनासुद्धा जाहीर समज द्यायला हवी होती. पण तसे काहीही झाले नाही. उलट वाजपेयी हे अडवाणींच्या रथावर स्वार झाले. अयोध्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन पुढे वाजपेयी या देशाचे पंतप्रधानही बनले. 


टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन
वार्ताहर कृष्णकुमार सिंग


अयोध्येकडे निघालेली लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडविण्याचे धाडस तेव्हाचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दाखविले. अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये आली तोपर्यंत संपूर्ण देशातील वातावरण तापलेले होते. बिहारातही तीच स्थिती होती. अडवाणी समस्तीपूर येथील सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. संघोटे (संघोटे म्हणजे संघवाले. माझे स्नेही रविन्द्र तहकिक यांनी या शब्दाची निर्मिती केली आहे. लंगोटे तसे संघोटे.) रस्त्यावर उतरून धिन्गाणा घालित होते. जळते टायर फेकत होते. अल्पसंख्याक समाजही विरोध करीत होता. वातावरण अत्यंत प्रक्षोभक बनले होते. अशा स्थितीत लालूंनी अडवाणींच्या अटकेचे आदेश दिले. २३ ऑक्टोबर १९९० रोजी पहाटे कथिल पुरुषास अटक करण्यात आली तसेच ताबडतोब हेलिकॉप्टरद्वारे मासन जोरे येथे हलविण्यात आले. मासन जोरे शहर आता झारखंडमध्ये आहे. तेव्हा झारखंड राज्याची निर्मिती झालेली नव्हती. हा भाग बिहारातच होता. विशेष म्हणजे अडवाणी यांची रथयात्रा अडविण्यासाठी आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही मोठी भूमिका बजावली होती. अडवाणी यांना अटक करण्यासाठी नितीशकुमार हे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिन्ग यांच्यावर सतत दबाव टाकीत होते. अडवाणी यांच्या अटकेचे वार्तांकन करणारे टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालीन वार्ताहर कृष्णकुमार सिंग उर्फ के. के. सिन्ग यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर चांगला प्रकाश टाकला आहे. (निवृत्त झालेले सिन्ग हे आता ब्लॉग लिहितात. त्याची लिंक अशी आहे : http://kksingh1.blogspot.com/)

गुजरात दंगल
वाजपेयींचे मोठेपण सांगण्यासाठी मीडियावाले दुसरे उदाहरण गुजरात दंगलीचे देतात. गोध्रा कांडानंतर उसळलेल्या मुस्लिमविरोधी दंगलीत ३ हजारांपेक्षाही जास्त मुस्लिमांना ठार मारण्यात आले. ही दंगल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच पुरस्कृत केली होती. तेव्हा देशाचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी! जनाच्या लाजं काजं वाजपेयी यांनी गुजरातच्या दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. ४ एप्रिल २००० रोजी त्यांनी अहमदाबादेतील शाह आलम भागातील निर्वासितांच्या छावणीला भेट दिली. या छावणीत दंगलीमुळे घरदार सोडावे लागलेल्या मुस्लिमांना ठेवण्यात आलेले होते. या छावणीला भेट दिली तेव्हा वाजपेयी म्हणाले : "माझी मान शरमेने खाली झुकली आहे. हजारो लोकांना आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले आहे. मी लवकरच काही मुस्लिम देशांचा दौरा करणार आहे. तेथे गेल्यानंतर मला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, हे मला माहीत नाही." याच दौ-यात वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, "राजधर्म का पालन करो. राजा के लिए प्रजा-प्रजा मे कोई भेदभाव नही होना चाहीए." वाजपेयींचे हे वाक्य फारच गाजले. वाजपेयी कसे चांगले आहेत, हे सांगण्याची मीडियामध्ये जोरदार स्पर्धा लागली. पण प्रश्न असा आहे की, स्वत: वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन केले का? गुजरातमधील दंगलग्रस्त मुस्लिमांना न्याय दिला का? दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ठार मारण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल वाजपेयींना खरेच कळवळा होता, तर वाजपेयी यांनी सर्वप्रथम मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हाकलायला पाहिजे होते. इतकेच नव्हे, तर गुजरातेत राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. पण यातले काहीही त्यांनी केले नाही. गुजराती मुस्लिमांना आजही न्याय मिळाला नाही. वाजपेयींनी ठरविले असते, तर मुस्लिमांना न्याय नक्की मिळाला असता. पण वाजपेयी नेहमीप्रमाणे ढोंगीपणाने वागले. नुसतेच बोलले. केले काही नाही. 

वाजपेयींनी भाजपा का सोडला नाही?
वाजपेयींचा बाबरी मशीद पाडण्यास विरोध होता. वाजपेयींचा गुजरात दंगलीला विरोध होता, हे एक वेळ खरे मानून चालू या! हे खरे मानले, तर मग प्रश्न असा पडतो की, वाजपेयी आयुष्यभर भाजपात का राहिले? बाबरी मशीद पाडल्यामुळे देशाची मानसिक फाळणी झाली. दंगलींचा आगडोंब उसळला. दहशतवादाला वाढावा मिळाला. गुजरात दंगलींनी देशाच्या कपाळावर अमानुषतेचा कलंक लागला. या घटनांनी कोणताही सुहृदय माणूस हेलावून गेला असता. वाजपेयी हेलावले असते, तर त्यांनी त्याचक्षणी भाजपाला राम राम ठोकला असता. पण वाजपेयी बुडाला डिन्क लावल्याप्रमाणे खुर्चीला घट्ट चिकटून राहिले. 

वाजपेयी यांचा हा सर्व दांभिकपणा सुरू असताना अत्रे असते तर काय झाले असते? अत्रे म्हणाले असते : अरे हा कसला अटल बिहारी हा तर अट्टल ढोंगी आहे. याच्यासारखा ढोंगी माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढील १० हजार वर्षांत होणार नाही.

Tuesday, 29 May 2018

समग्र माफीवीरस्य कथा

एटीएम बाबा 
Disclaimer: ही सत्यकथा काल्पनीक आहे याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

माफीवीर यांचे विचार उथळ होते. बलात्काराचे उघड समर्थन कुठलाही विचारवंत करत नाही. त्यांनी तुमच्या बायका मुलींवर बलात्कार केला तर बदला म्हणून तुम्ही पण तेच करा हा सल्ला विचारवंत देत नसतो. असं न करणारे हिंदू हे #बुळगे_हिंदू असतात, असं यांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांचा स्त्रियांबद्दलचा आदर यांच्या दृष्टीने बकवासगिरी होती. आमच्या स्त्रियांना आदर देण्याच्या विनम्रपणाला बुळगे म्हणून यांनी आमच्या भावना दुखावल्यात, आमच्या संस्कृतीची टिंगल टवाळी करणारे असे लोक आमच्यासाठी धर्मद्रोहीच.

शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे #काकतालीय_योग (कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडणे). बरं एवढं सर्व लिहिलं आणि स्वतः काय कार्य करून दिवे लावले तर, इंग्लंडमध्ये पहिल्यांदा ६ महिन्याची शिक्षा भोगली (देशासाठी नव्हे तर... वैयक्तिक कारणास्तव). काहीच जमलं नाही आणि जमवलेले आठ दहा शिष्य पण याच्यावर शंका घेऊ लागल्याने, मदनलाल यास बॉम्ब टाकण्यास उचकवले. मदनलाल हकनाक लटकला.

भारतीयांचा मित्र बनलेल्या जॅक्सनचा खून करण्यासाठी कान्हेरेंना उचकवलं, पिस्तूल दिलं, कान्हेरे लटकले आणि इंग्रजांनी यांना अटक केली. मार्सेलिस बंदरात जहाजाच्या पोर्टहोल मधून वीस फूट उंचीवरून उडी मारली, १० फूट पोहून किनारा गाठला, किनाऱ्यावर ४०० मीटर पळाल्यावर पेस्की या शिपायाने पुन्हा पकडून इंग्रजांच्या हवाली केलं. फ्रांसच्या किनाऱ्यावर (हद्दीतून) भारतीय #गुन्हेगार पकडला गेला म्हणून चार ओळीची बातमी आली आणि नातेवाईकांनी १९४७ नंतर या बातमीचे दाखले देत ही उडी त्रिखंडात गाजवली.

कारागृहात ४ -५ दिवस #कोलू ओढल्यावर कळून चुकलं की हे काम बहुजनांनीच करायचं असतं आपुन के बस की बात नही. नंतर ८ -१० दिवस #काथ्या सुटल्यावर नाजूक हातांना सोसवले नाही, बहुजनांच्या बायकांनीच काथ्या कूट करावी, मेरे हात छिल जायेंगे. हे काम जमलं नाही म्हणून अंधाऱ्या खोलीत कोंडल्यावर माफीनामे सुरु झाले.
तब्बल १० वेळा #माफीनामे लिहून दिल्यावर इंग्रजांनी मरेपर्यंत ब्रिटिश सरकारसाठी काम करायच्या करारनाम्यावर सोडलं, वरून ६० रुपयांची पेन्शन पण सुरु केली.

उडी गाजवलेल्या स्वजातीय नातेवाईकांनी माफीनाम्याची तुलना शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंगाशी केलेल्या तहाशी केली. या महाभागांना माहित नव्हतं का की शिवरायांनी तहात दिलेले किल्ले परत जिंकले. त्यासाठी सिंहासारख्या तानाजींना गमवावे लागले. #शिवरायांशी तुलना करून आमच्या भावना दुखावण्याचा अधिकार यांना कुणी दिला ??
यांनी काय केलं तर मरेपर्यंत ६० रुपयात ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या खबरा पोचवल्या. प्रति सरकारचे क्रांतिकारी नागनाथ अण्णा नायकवाडी यांना इंग्रजांची गोळी खावी लागली, क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांच्या याच प्रति सरकारला हे पत्री सरकार म्हणायचे.

नंतर १९३१ मध्ये स्वतःच स्वतःला #स्वातंत्र्यवीर (भारत १९४७ ला स्वतंत्र झाला, पण हा आधीच तुरुंगातून स्वतंत्र झाल्यामुळे) हि उपाधी जोडून घेतली.

हिंदू महासभेच्या १९३७ सालच्या अहमदाबाद अधिवेशनात द्विराष्ट्र्वादाची संकल्पना सर्वप्रथम यांनीच मांडली. १९४० साली जिनाच्या मुस्लिम लीगने वेगळ्या पाकिस्तानचा ठराव लीगच्या अधिवेशनात मांडला. या दोन्ही वेगळं राहणाऱ्या भावांची युती होणे नैसर्गिकच होतं. या दोन भावांनी फाळणी घडवून आणली जिना प्रत्यक्षपणे तर हे लपून.
फाळणी होईपर्यंत जीनांची मुस्लिम लीग आणि यांची हिंदू महासभा या युतीची सिंध, मुलतान आणि बंगाल या मुस्लिम बहुल भागात संयुक्त सरकारे होती. या सरकारांच्या आश्रयाने या भागांत मुस्लिम लीगने फाळणीच्या समर्थनार्थ दंगली घडवल्या. पण वाचवायला नौखाली मध्ये गांधीजींना जावं लागलं, गांधींनी तिथे जाऊन दंगली शमवून, शांतता प्रस्थापित करून हिंदूंना वाचवले. मुस्लिमांनी गांधींना दिलेला शब्द पाळला.
नपुंसक हिंदू महासभा कुठे होती ?
तिकडे दंगली चालू होत्या आणि इकडे माफीवीर संस्थानिकांना पत्रं पाठवून, प्रत्यक्ष भेटून भारतीय संघराज्यात सामील होऊ नका म्हणून सांगत फिरत होते.

जेथे जेथे हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांची संयुक्त सरकारे होती, तो सर्व भाग पाकिस्तानात गेला. हा निव्वळ योगायोग नव्हे. हा जीनांच्या व्यापक षडयंत्राचा भाग होता. त्यात माफीवीर ही सहभागी होते.
शेवटी काहीच जुळून आलं नाही राजदरबारी नोकरी मिळण्याची शक्यता संपल्याने, कारस्थान करून नाथ्याला महात्माची हत्या करायला साहाय्य केलं, इथेपण नाथ्या आणि नाऱ्या लटकले आणि हे नामनिराळे.
१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मैसूर सहित जिथं जिथं माफिवीरांनी नौकरीसाठी अर्ज दिले होते ती सर्व संस्थाने खालसा झाली.

सर्वच प्लॅन फेल गेले, आयुष्यभर काहीच करू शकलो नाही याचे दुःख मनाला लागले, महात्मांच्या हत्येत असलेला सहभाग पण मनाला खात होता. अशा अवस्थेत १९ वर्ष काढली आणि शेवटी उपवास करून आत्महत्या (प्रायोपवेशन) केली.

इति समग्र माफीवीरस्य कथा समाप्त

दांभिक सावरकर

"आसिंधुसिंधू भारतभूमिका हि ज्याची पितृभूमी नि पुण्यभू आहे तो हिंदू" अशी हिंदू शब्दाची ची व्याख्या करत बौद्ध, शीख, जैन धर्मियांना "हिंदू" च्या व्याख्येत समाविष्ठ करून घेत सावरकरांनी त्यांना हिंदुत्वाचे अधिकारी जरूर ठरवलं. पण बाबासाहेबानी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मांचा स्वीकार करायचा निर्णय घेतला तेंव्हा मात्र या वीराच्या निधड्या छातीत धडकी भरली. अपचनाचा त्रास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसारखे ते बेचैन झाले आणि बाबासाहेबांवर आपल्या फुसक्या युक्तिवादाच्या टिकाश्त्राने वार करण्यास सुरुवात केली.

आंबेडकरांवर टिका करताना 1956 ला सावरकर लिहतात :
"अस्पृश्यानी हिंदू धर्म सोडू नये भिक्षु आंबेडकरांच्या "थापांना" त्यांनी बळी पडू नये. अस्पृश्यांनी आपल्या स्वतःच्या पूर्वजांना आंबेडकरांच्या नादी लागून पाखंड्यात , पतीतांत किंवा मुर्खात काढू नये. अस्पृश्य हिंदू राहतील तरच अस्पृश्यता अधिक सुलभतेणे नाहीशी होईल." त्यांनी आंबेडकरांच्या निर्णयाचं स्वागत न करता त्यांना थापाडे हिंदुराष्टद्रोही भिक्षु दुष्कर्मी आंबेडकर अशी दुषणे देत टीका केली आहे. केसरी मध्ये ओक्टोम्बर 30, 1956 मध्ये सावरकर लिहतात कि "पूर्वी बौद्धांनी म्लेच्छांशी हातमिळवणी करून म्लेंछे राज्ये भारतात स्थापून हिंदुराष्ट्रद्रोह केला तोच आंबेडकर आज करत आहेत हिंदुराष्ट्राच्या या हितशत्रूंन पासून अखंड सावधान असावे हेच उत्तम, आंबेडकरांच्या या धर्मांतराचे आंधळे कौतुक करू नये"

बाबासाहेब हे बौद्ध धर्माचा स्वीकार करून देखील त्यांनीच दिलेल्या हिंदू व्याख्येप्रमाणे हिंदूच राहणार होते ना? बाबासाहेबांचे आणि त्यांच्यासोबत धर्म परिवर्तन करणारे त्यांचे अनुयायी यांचे पूर्वज देखील प्राचीन काळापासून भारतभूमीतच निवसत आलेच होते ना? त्यामुळे भारतभूमी हीच त्यांची पितृभूमी ठरतच होते कि ? भारत भूमी देखील बौद्धांसाठी पुण्यभूच(holy land) आहे ना? बौद्ध धर्माचा स्वीकारकेल्यामुळं मुस्लिम किंवा इसाई धर्मियांसारखी अरबस्थान किंवा पॅलिसटाइन हि त्यांची पुण्यभू ठरणार तर न्हवतेच ना ? सावरकरांनी दिलेल्या हिंदूंच्या या व्याख्येत बौद्धधर्म पूर्ण फिट होतच होता ना ? त्यामुळे बौद्धधर्मीय पूर्णपणे हिंदुत्वाचे अधिकारी ठरत होतेच ना ? मग सावरकरांना आंबेडकरांचा हिंदू धर्म त्यागाच्या निर्णयाचा विषाद का वाटावा ? त्यांना मिरची लागायचं कारण काय ?

यातून त्या वीराच्या छातीत दडलेला कट्टर सनातनी हिंदू धर्मियच प्रकट झालेला दिसत आहे. हाच तो त्या वीराचा नि हिंदुत्ववाद्यांचा उपयुक्ततावाद मुस्लिम जमातवाद्यांशी लढण्यापुरतेच ते हिंदुत्वाचे अधिकारी इतरवेळी शीख बौद्ध जैन धर्मीय हे वेगवेळे हिंदू न्हवे !

टीप- मुस्लिम आणि इसाई लोकांना फक्त त्यांच्या धर्ममतांमुळे भारतभूमी हि पुण्यभू नाही असं समजणे देखील भारताच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासाला हातभार लावणाऱ्या भारतीय मुस्लिम आणि इसाई धर्मियांचा हा अपमानच आहे. हा अब्दुल कलमांचा अपमान आहे हा भरतभूमिचा रक्षणासाठी शाहिद झालेल्या लढलेल्या प्रत्येक मुस्लिम इसाई जवानांचा, पोलिसांनाच देखील अपमान आहे...
Sagar Waghmare यांच्या फेसबुक भिंतीवरून)

त्रिखंडात न गाजलेल्या दोन महान उड्या

सुहास भुसे
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात दोन महान उड्या आहेत. सोन्याची अक्षरे करून लिहिल्या तरी त्यांचे मोल होणार नाही.
पहिली उडी #वसंतदादा पाटलांची..
सांगलीतील गणेशदुर्गाच्या तुरुंगाच्या तटावरून दादा व त्यांच्या 14 सहकाऱ्यांनी पोलिसांच्याच बंदुका पळवुन थेट खंदकात उड्या मारल्या..पोलिसांनी गोळीबाराच्या फैरी झाडत दादांचा भर बाजारातून चित्तथरारक पाठलाग केला ज्यात दादांचे 2 सहकारी हुतात्मा झाले. पळत पळत कृष्णेवरील पुलावर आले असताना दादा व त्या सर्व स्वातंत्र्यवीरांनी क्षणाचाही विचार न करता वंदे मातरम म्हणत पुलावरून रो रो रोरावणाऱ्या कृष्णेच्या महापुरात 40 फुटांवरून उड्या ठोकल्या. गोळ्यांचा पाऊस सुरूच होता त्यात स्वतः दादा खांद्यावर गोळी लागून जखमी झाले.
वसंतदादांची ही उडी आणि हे तुरुंग फोडून पलायन एखाद्या साहसी हॉलिवूडपटात शोभेल असेच आहे. ग्रेट एस्केप किंवा वन द्याट गॉट अवे आठवत असेलच ...
आणि दुसरी उडी पद्मभूषण #नागनाथ_अण्णा नाईकवडी यांची..
अण्णांनी वसंतदादांच्या साहसापासून प्रेरणा घेत सातारचा सेलुलर जेल फोडला. आणि तटावरुन उडी मारून, हा अभेद्य समजला जाणारा सातारा जेल फोडून, ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन यशस्वी पलायन केले.
...इतिहास निर्माण करणारे आणि इतिहास लिहिणारे वेगवेगळे असल्याने या दोन चित्तथरारक उड्या 'त्रिखंडात' गाजल्या नाहीत.!
(Suhas Bhuse यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

गोमांतकीय मराठा समाज

ज्ञानेश परब
दीनानाथ मंगेशकर कुटुंबीय हे 'गोमांतकीय मराठा समाजा'तील आहे. या समाजाला कोकणात 'देवळी किंवा बंदे मराठा' असेही काही ठिकाणी म्हटले जाते.
गोवा/गोमंतक, कारवार, तळकोकण/सिंधुदुर्ग, बेळगाव आदी भागात देवदासी किंवा भाविणी असतात. या भाविणी म्हणजे देवाला वाहिलेल्या स्त्रिया असतात. यांचे लग्न ग्रामदेवळातील देव शंकराशी म्हणजे मंगेशाशी होते. आणि मग त्या गावातील कोणत्याही प्रतिष्ठित, सधन संपत्ती असलेल्या पुरुषाचे अंगवस्त्र म्हणून राहतात.
त्या भविणींना या प्रतिष्ठित पुरुषापासून जी संतती होते, त्या संततीच्या शिक्षणाची, पालनपोषणाची नि भाविणीच्या आयुष्यभर पालनपोषणाची जबाबदारी शेवटपर्यत त्या पुरुषाला करायची असते. फक्त त्या पुरुषाशी त्या भाविणीला लग्न करता येत नाही. तसेच त्या पुरुषाच्या संपत्तीत तिची मुले स्वतःचा हक्क/वाटा मागू शकत नाहीत. तो मात्र त्या पुरुषाच्या अधिकृत बायको आणि तिच्या मुलांना वारस म्हणून मिळतो.
या भाविणीच्या मुलांपासून झालेला समाज म्हणजे 'गोमंतक मराठा समाज'
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अभिनय करणारे, तसेच भारतीय/उत्तर हिंदुस्थानी संगीतात गाणारे बरेच लोक या समाजाचे आहेत. वानगी दाखल हंसा वाडकर, शांता हुबळीकर, जयश्री कामुर्लीकर(व्ही. शांताराम यांची दुसरी पत्नी/राजश्रीची आई), जयश्री गडकर, शोभा गुर्टू, मंगेशकर कुटुंबीय, पद्मिनी कोल्हापुरे, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर वगैरे.....
मला हे सर्व सांगायचे कारण म्हणजे माझ्या या गावात लहानपणापासून मी या भाविणी म्हणजे कलावंतिणी बघितल्या आहेत. तिथे एका गावात जवळपास चारपाच भाविणी असायच्या. त्या त्या गावात तेथील समाजानुसार त्यांची वाटणी झालेली असायची. बहुतेक भाविणी आणि त्यांची मुले त्यांचे संपूर्ण नाव लिहिताना स्वतःचे नाव, त्यांच्या गावाचे नाव आणि त्यापुढे 'कर' असे लिहून आडनाव लिहितात. जसे मंगेशकर, वाडकर, कोरगावकर, शिरोडकर, आरोंदेकर वगैरे.....
त्या अधिकृतरीत्या त्या गावातील ग्रामदेवतांची सेवा करतात. त्यांना थेटपणे कोणीही इतर पुरुष वाईट दृष्टिकोनातून बघत नाहीत. यात एक महत्वाचे म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठित पुरुषाच्या अंगवस्त्र असतात म्हणून. थोडक्यात त्या सुद्धा एक प्रतिष्ठित व्यक्ती असतात.
त्यांना तसा गावातील वाड्यांमध्ये मानही असतो. एखाद्याला मुलं झाले, बारसे असेल, कोणाच्या घरी लग्न असले, गृहप्रवेश कार्यक्रम असला, समारंभ असला, कोठल्यातरी उपक्रमाचे उदघाटन वगैरे असले कि त्यांना खास निमंत्रण दिले जाते. त्यांची सवाष्णिकडून साडी-खण-नारळाने ओटी भरली जाते. त्यांची पूजा केली जाते. आम्हां सर्व लहान मुलांना त्यावेळी त्यांच्या पाया पडावे लागायचे.
मला लहानपणाचे आठवतेय ते आमच्या परबांची अधिकृत भावीण(म्हणजे आमच्या परबांपैकी एक प्रमुख परब शेठ यांनी तिचे पालनपोषण केले होते) रत्नाबाई भावीण आमच्याकडे लहानपणी यायची. ती शिकलेली होती. शाळेत सातवीपर्यंत गेलेली होती. मी तिला रत्ना आजी म्हणायचो. ती फार प्रेमळ होती. मला भरभरून आशीर्वाद द्यायची.
तिने शिरोड्याला मिठाच्या सत्याग्रहात स्वयंसेवक म्हणून काम केले होते. त्यांच्या इतर गाण्यांबरोबर तिला त्यावेळची स्वातंत्र्यसैनिकांची गाणीसुद्धा पाठ होती. तिचा आवाज, गळा गोड होता. दिसायला सुंदर होती.
गावातील तो ऐपतदार पुरुष स्वतःच्या कुटुंबाबरोबर या भाविणीच्या कुटुंबाला पोसत असतो. यांना 'कलावंतीण' एव्हढ्याकरिता म्हटले जाते कारण यांच्या अंगात संगीत, शास्त्रीय गाणे, शास्त्रीय नृत्य, वेगवेगळ्या प्रकारच्या कला, चांगले सुग्रास जेवण करणे, आपल्या पुरुषाचे सर्व प्रकारचे लाड पुरवणे वगैरे उपजत गुण असतात. किंबहुना त्यांना या गोष्टींचे परंपरागत शिक्षण दिले जाते.
अर्थात हे पुरुषसत्ताक पद्धतीतील केवळ पुरुषांचे वर्चस्व जोपासण्याकरिता आणि समाजातील उच्चवर्गीय, केवळ ठराविक पुरुषांना सेवा मिळावी याकरिता केले जायचे.
या भाविणीला/स्त्रीला जर एकच मुलगी झाली तर तिला पुढे हाच भाविणीचा पेशा पत्करावा लागायचा. आणि जास्त मुली असतील तर त्यातील एखादी भावीण बनायची आणि बाकीच्यांची लग्ने व्हायची. तसेच जर मुलगा झाला असेल तर तो पुढे दुसरी कोठल्याही एका भाविणीच्या भावीण न झालेल्या मुलीशी लग्न करायचा. अशा पद्धतीने गेली चारशे पाचशे वर्षे येथे असा हा समाज तयार झाला आहे.
या भाविणीना संभाळणारे पुरुष हे बहुतेक सारस्वत समाजातील सधन ब्राह्णण, मराठा सरदार, जमीनदार, किंवा वैश्य समाजातील व्यापारी या समाजातील आणि गावातील प्रतिष्ठित असे समजले जाणारे गावकार/भाटकार असे असतात. त्यामुळे या समाजात शिक्षणाने समृद्ध, कलावंत आणि खाऊन पिऊन सुखी असलेले लोक भरपूर आहेत.
पण दुर्दैवाने त्यांना म्हणावी तशी सामाजिक प्रतिष्ठा त्या गावात लाभत नाही. पुढे यांच्यातील बरेच लोक मुंबई, पुणे, बडोदा, इंदूर, सांगली, कोल्हापूर येथे स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे नाव मोठे केले.
भाविणीने जर या रुढितून बंडखोरी करून अधिकृतरीत्या लग्न केले तर देव मंगेशाचा कोप होऊ शकतो आणि तिचा वंश किंवा तिचा अधिकृत नवरा मरू शकतो असा तेथील लोकांमध्ये गैरसमज/अंधश्रद्धा आहे.
तुम्ही सर्वानी जयवंत दळवी यांची 'महानंदा' हि कादंबरी वाचली असेल.
तुम्हांला अजून जास्त माहिती हवी असेल तर जयवंत दळवी यांची 'महानंदा' हि कादंबरी वाचा किंवा त्यावर आधारित चित्रपट किंवा त्यावर आधारित नाटक 'गुंतता हृदय हे' बघा.
जयवंत दळवी हे आरवली या गावातील सारस्वत समाजातील सधन कुटुंबातील. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण हे त्या गावाशेजारील दुसरे मोठे प्रसिद्ध गाव शिरोड्यातील ट्युटोरियल हायस्कुल (सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर येथेच पंचवीस वर्षे शिक्षक आणि मुख्याध्यापक होते) येथे झाले नंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले.
माझे आजोळ शिरोड्याचे आणि माझे गाव आरोंदा. हि आरोंदा, शिरोडा, रेडी, कन्याळ, आरवली, आजगाव, तिरोडा, नाणोस हि जवळपासची पंचक्रोशीतील तळकोंकणातील गावे. त्यात आरोंदा आणि रेडी हि महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील गावे.
एक मात्र खरे या भविणींना त्याकाळी तशी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. पण आज म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांत भावीण हि प्रथा हळूहळू कमी होत चाललीय. आणि हा मुळातच सर्वच बाबतीत(पैसे, शिक्षण, उद्योग, राजकारण) इतर समाजापेक्षा पुढे असलेला हा गोमंतकीय मराठा समाज सुद्धा अजून प्रगतिशील होत चाललाय हि एक चांगली गोष्ट आहे.
पण त्या समाजातील काही सेलिब्रिटीज(सर्व नव्हे) मात्र आपापली रूट्स/मुळे विसरून आपल्या पूर्वजांना (भाविणीना आणि त्यांच्या मुलबाळांना) तत्कालीन हिंदू वर्णवर्चस्ववादी समाजाकडून झालेल्या अपमानाचा विसर पडत, तेच सेलिब्रिटीज कडवे हिंदू किंवा ब्राह्मणवादी/वर्णवादी बनत चाललेय हि मात्र मोठी खंत आहे.

टीप: या लेखाची प्रेरणा आपले येथील सर्वांचे आवडते मित्र, सामाजिक जाणीव असलेले लेखक, आंबेडकरी विचारवंत श्री. मिलिंद धुमाळे यांच्या एका पोस्टवरून.
( Dnyanesh Parab यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

भिडे एकटे कुठे आहेत?

मनोहर भिडे म्हणाले मनूच्या सावलीला उभं राहण्याची लायकी नाही. मनुस्मृती ही पहिली घटना असल्याचे तारे तोडलेत. मनुस्मृती पहिली घटना आहे आणि तिच्याबद्दल भिडेंना सहानुभूती आहे यात नवल काय? मनुस्मृती ब्राह्मणांना उच्च मानते तर ब्राह्मणेतरांना समानतेचा अधिकार नाकारते. मनुस्मृती पहिली घटना होती आणि तिची अंमलबजावणी मोठ्या काटेकोरपणाने करण्यात आली होती. माणसांना माणसांप्रमाणे न वागवणारी मनुस्मृती किती योग्य वाटतेय भिडेंना.

पण भिडे एकटे कुठे आहेत? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी सुद्धा मनुस्मृतीचे समर्थन त्यांच्या विचारधन पुस्तकात केलेले आहेच की. आणि त्यांच्या अनुयायांनी ते पुस्तक शिरसावंद्य मानून त्याच मनुस्मृतीचे गुप्तपणे केलेले पालन आपण वेळोवेळी पाहतच आलोय.

मनुस्मृतीचे नियम मोडणाऱ्या तुकारामांना गाथा बुडवायला लावली ती वृत्ती कोणती होती? मनुस्मृती ब्राह्मणांना विशेष अधिकार देते कारण ब्राम्हण ब्रम्हाच्या मुखातून उत्पन्न झाले आहेत. याच घटनेने शिक्षणाचा अधिकार ब्राह्मणांकडे ठेवला होता. संस्कृत देव भाषा ती ऐकली तर, वाचली तर भयंकर शिक्षा देण्यात येत असत. महात्मा फुलेंनी ती चौकट मोडली. त्यासाठी त्यांच्यावरही मारेकरी घातले गेले. सावित्रीमाईंना शेणाच्या गोळ्यांचा, दगडांचा मारा सहन करावा लागला. पराकोटीचा त्रास दिला गेला. तरीही महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी आपले काम थांबवले नाही. बहुजन, शूद्र व अतिशूद्र यांच्यासाठी शिक्षणाची द्वारे उघडलीत. पण भिडे महात्मा फुलेंबद्दल अपशब्द उच्चारतो. का कारण महात्मा फुले मनुस्मृतीची चौकट मोडून काढतात. भिडेंच्या संघटनेत महिलांना प्रवेश नाही याची कारणे त्यांच्या भक्तांनाच ठाऊक. पण बहुजनांच्या शिक्षणाची महात्मा फुलेंनी उघडलेली द्वारे भिडे मोठ्या शिताफीने अडवताहेत. त्यासाठी शिवरायांचा आडोसा घेताहेत. आणि आता मनुस्मृतीचे समर्थन करून बहुजनांची डोकी ठिकाणावर नसल्याचे त्यांनी दाखवून दिलंय.

छत्रपती शाहूंचे वेदोक्त प्रकरण व त्यांना शूद्र म्हणण्याचा अधिकार मनुस्मृतीने दिला. मात्र त्यामुळे पेटून उठत शाहू महाराजांनी त्या चौकटीच्या चिंधड्या उडवल्या. शाहू महाराजांनी केलेलं काम मनुस्मृतीच्या मुळावर घाव घालणारे ठरले. शाहूंचा विचार जनमानसात रुजला पण त्याची किंमत हिंदुत्ववाद्यांच्या आहारी गेलेल्या कित्येकांना कळली नाही.

पूर्वी कधीकाळी टिळकांनी म्हंटले होते की तेल्यांना संसदेत जाऊन काय तेल काढायचे आहे का? की कुणब्यांना नांगर धरायचा आहे? यातून टिळकांना काय अपेक्षित असावं याची झलक दिसते. टिळक गेल्यावर गांधींनी सर्वसमावेशक राजकारण करण्यास सुरुवात केली आणि कित्येक सनातनी लोकांच्या डोळ्यात गांधी खुपायला लागले. गांधींचा खून याच वृत्तीने केला. कारण त्यांना त्यांच्या हातातून गेलेली सत्तेची सूत्रे जास्त खुपत होती. गांधींना ठार करण्याची वेळ त्यांनी मोठ्या चलाखीने निवडली. आणि त्याचा प्रचारही मोठ्या चलाखीने केला गेला. पण फाळणीआधी गांधींना मारण्याचे 6 हुन अधिक प्रयत्न केले गेले होते हे समोर येऊच दिले गेले नाही.

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि समानतेने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे हा संदेश सर्वांना दिला. मनुस्मृतीचे पालन करणाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कमी त्रास दिला नाही.

मनुस्मृतीचा उदोउदो करणं गरजेचं का आहे? कारण प्राचिन ग्रंथाच्या नावावर जातिश्रेष्ठत्वा लोकांच्या मनावर बिंबवता येतं. ज्या मनुस्मृतीने बहुजनांना समानतेचा अधिकार नाकारला ते बहुजन तरुण धर्माभिमानाच्या खोट्या अहंकारात स्वतःच्या गुलामीच्या कारणांना डोक्यावर घेऊन मिरवताय. त्यांना स्वतःच्या होणाऱ्या पतनाची केंद्रे आणि कारणे समजून घ्यायची नाहीयेत. डोळ्यावर असलेली धर्माभिमानाची पट्टी त्यांना डोळस होऊ देत नाहीये. जागतिकीकरणाने उघडलेली संधीची द्वारे न पाहता ते मनुस्मृतीच्या समर्थकांचा उदोउदो करण्यात गुंग आहेत. या उदोउदोतून डोकं वर काढून विचार करण्याची सुद्धा बुद्धी या तरुणांकडे नाही.

- राहुल बोरसे.

Wednesday, 4 April 2018

५५ कोटींचा बहाणा

नथुराम गोडसे याचा भाऊ गोपाळ गोडसे याने गांधी हत्येवर  ‘५५ कोटींचे बळी’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात गोपाळ गोडसे म्हणतो की, ‘भारताच्या फाळणीच्या वेळी भारत सरकारच्या कोषात जी शिल्लक होती, त्यातील ५५ कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते. पाकिस्तानने काश्मिरात सैन्य घुसविल्यामुळे भारत सरकारने हे ५५ कोटी रुपये देण्याचे नाकारले. मात्र महात्मा गांधी यांनी अशा प्रकारे वचन मोडणे चुकीचे असल्याचे सांगून पाकिस्तानला ठरल्या प्रमाणे ५५ कोटी रुपये देण्यास सांगितले. इतकेच नव्हे, तर आठवड्यात उपोषणही केले. त्यामुळे १३ जानेवारी १९४८ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक पाकिस्तानला हा पैसा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रक्षुब्ध झालेल्या गोडसे आणि त्याच्या मित्रांनी महात्मा गांधी यांची हत्या केली...‘
गोपाळ गोडसे याने केलेला हा दावा खोटा आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानला एकूण ७५ कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाकिस्तानला देण्यातही आला होता. उरलेले ५५ कोटी रुपये देण्याचे भारत सरकारने रद्द केले नव्हते. या पैशाचे हस्तांतरण केवळ तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आले होते.  पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय भारत सरकारने १३ जानेवारी १९४८ रोजी घेतला होता. त्या आधी महात्मा गांधी यांना मारण्याचे एकूण ५ प्रयत्न झाले होते. १९३४ मध्येच गांधींना मारण्याचा पहिला प्रयत्न झाला. याचाच अर्थ ५५ कोटींच्या घटनेच्या तब्बल १४ वर्षे आधीपासून गांधींना मारण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. त्यामुळे ५५ कोटींचे बळी हा गोपाळ गोडसे याचा दावाच खोटा ठरतो.
महात्मा गांधी यांच्या हत्येमागील कारणे वेगळीच आहेत.
सर्व प्रथम एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, गांधी हत्येतील सर्व आरोपी ब्राह्मण आहेत. महात्मा गांधी हे भारताचे निर्विवाद नेते असले तरी ते जातीने ब्राह्मण नव्हते. ते बहुजन समाजातून आले होते. ब्राह्मणेतराने देशाचे नेतृत्व करावे हे ब्राह्मणवाद्यांच्या पचनी पडत नव्हते. अनेक बडे ब्राह्मण नेतेही त्याकाळी महात्मा गांधी यांची अनुयायी होते. पंडीत जवाहरलाल नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण होते. महाराष्ट्रातील साने गुरुजी आणि विनोबा भावे ही त्यातील काही ठळक नावे होत. महात्मा गांधी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरू मानले होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी तुकाराम महाराजांना शत्रूस्थानी मानीत असत.
ही गांधी हत्येमागील खरी कारणे आहेत. महात्या गांधी जातीने ब्राह्मण असते आणि त्यांनी तुकोबांऐवजी रामदासांना गुरू मानले असते, तर ब्राह्मणांनी त्यांची नक्कीच नित्यपुजा केली असती.