एटीएम बाबा
Disclaimer: ही सत्यकथा काल्पनीक आहे याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.माफीवीर यांचे विचार उथळ होते. बलात्काराचे उघड समर्थन कुठलाही विचारवंत करत नाही. त्यांनी तुमच्या बायका मुलींवर बलात्कार केला तर बदला म्हणून तुम्ही पण तेच करा हा सल्ला विचारवंत देत नसतो. असं न करणारे हिंदू हे #बुळगे_हिंदू असतात, असं यांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांचा स्त्रियांबद्दलचा आदर यांच्या दृष्टीने बकवासगिरी होती. आमच्या स्त्रियांना आदर देण्याच्या विनम्रपणाला बुळगे म्हणून यांनी आमच्या भावना दुखावल्यात, आमच्या संस्कृतीची टिंगल टवाळी करणारे असे लोक आमच्यासाठी धर्मद्रोहीच.
शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे #काकतालीय_योग (कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडणे). बरं एवढं सर्व लिहिलं आणि स्वतः काय कार्य करून दिवे लावले तर, इंग्लंडमध्ये पहिल्यांदा ६ महिन्याची शिक्षा भोगली (देशासाठी नव्हे तर... वैयक्तिक कारणास्तव). काहीच जमलं नाही आणि जमवलेले आठ दहा शिष्य पण याच्यावर शंका घेऊ लागल्याने, मदनलाल यास बॉम्ब टाकण्यास उचकवले. मदनलाल हकनाक लटकला.
भारतीयांचा मित्र बनलेल्या जॅक्सनचा खून करण्यासाठी कान्हेरेंना उचकवलं, पिस्तूल दिलं, कान्हेरे लटकले आणि इंग्रजांनी यांना अटक केली. मार्सेलिस बंदरात जहाजाच्या पोर्टहोल मधून वीस फूट उंचीवरून उडी मारली, १० फूट पोहून किनारा गाठला, किनाऱ्यावर ४०० मीटर पळाल्यावर पेस्की या शिपायाने पुन्हा पकडून इंग्रजांच्या हवाली केलं. फ्रांसच्या किनाऱ्यावर (हद्दीतून) भारतीय #गुन्हेगार पकडला गेला म्हणून चार ओळीची बातमी आली आणि नातेवाईकांनी १९४७ नंतर या बातमीचे दाखले देत ही उडी त्रिखंडात गाजवली.
कारागृहात ४ -५ दिवस #कोलू ओढल्यावर कळून चुकलं की हे काम बहुजनांनीच करायचं असतं आपुन के बस की बात नही. नंतर ८ -१० दिवस #काथ्या सुटल्यावर नाजूक हातांना सोसवले नाही, बहुजनांच्या बायकांनीच काथ्या कूट करावी, मेरे हात छिल जायेंगे. हे काम जमलं नाही म्हणून अंधाऱ्या खोलीत कोंडल्यावर माफीनामे सुरु झाले.
तब्बल १० वेळा #माफीनामे लिहून दिल्यावर इंग्रजांनी मरेपर्यंत ब्रिटिश सरकारसाठी काम करायच्या करारनाम्यावर सोडलं, वरून ६० रुपयांची पेन्शन पण सुरु केली.
उडी गाजवलेल्या स्वजातीय नातेवाईकांनी माफीनाम्याची तुलना शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंगाशी केलेल्या तहाशी केली. या महाभागांना माहित नव्हतं का की शिवरायांनी तहात दिलेले किल्ले परत जिंकले. त्यासाठी सिंहासारख्या तानाजींना गमवावे लागले. #शिवरायांशी तुलना करून आमच्या भावना दुखावण्याचा अधिकार यांना कुणी दिला ??
यांनी काय केलं तर मरेपर्यंत ६० रुपयात ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या खबरा पोचवल्या. प्रति सरकारचे क्रांतिकारी नागनाथ अण्णा नायकवाडी यांना इंग्रजांची गोळी खावी लागली, क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांच्या याच प्रति सरकारला हे पत्री सरकार म्हणायचे.
नंतर १९३१ मध्ये स्वतःच स्वतःला #स्वातंत्र्यवीर (भारत १९४७ ला स्वतंत्र झाला, पण हा आधीच तुरुंगातून स्वतंत्र झाल्यामुळे) हि उपाधी जोडून घेतली.
हिंदू महासभेच्या १९३७ सालच्या अहमदाबाद अधिवेशनात द्विराष्ट्र्वादाची संकल्पना सर्वप्रथम यांनीच मांडली. १९४० साली जिनाच्या मुस्लिम लीगने वेगळ्या पाकिस्तानचा ठराव लीगच्या अधिवेशनात मांडला. या दोन्ही वेगळं राहणाऱ्या भावांची युती होणे नैसर्गिकच होतं. या दोन भावांनी फाळणी घडवून आणली जिना प्रत्यक्षपणे तर हे लपून.
फाळणी होईपर्यंत जीनांची मुस्लिम लीग आणि यांची हिंदू महासभा या युतीची सिंध, मुलतान आणि बंगाल या मुस्लिम बहुल भागात संयुक्त सरकारे होती. या सरकारांच्या आश्रयाने या भागांत मुस्लिम लीगने फाळणीच्या समर्थनार्थ दंगली घडवल्या. पण वाचवायला नौखाली मध्ये गांधीजींना जावं लागलं, गांधींनी तिथे जाऊन दंगली शमवून, शांतता प्रस्थापित करून हिंदूंना वाचवले. मुस्लिमांनी गांधींना दिलेला शब्द पाळला.
नपुंसक हिंदू महासभा कुठे होती ?
तिकडे दंगली चालू होत्या आणि इकडे माफीवीर संस्थानिकांना पत्रं पाठवून, प्रत्यक्ष भेटून भारतीय संघराज्यात सामील होऊ नका म्हणून सांगत फिरत होते.
जेथे जेथे हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांची संयुक्त सरकारे होती, तो सर्व भाग पाकिस्तानात गेला. हा निव्वळ योगायोग नव्हे. हा जीनांच्या व्यापक षडयंत्राचा भाग होता. त्यात माफीवीर ही सहभागी होते.
शेवटी काहीच जुळून आलं नाही राजदरबारी नोकरी मिळण्याची शक्यता संपल्याने, कारस्थान करून नाथ्याला महात्माची हत्या करायला साहाय्य केलं, इथेपण नाथ्या आणि नाऱ्या लटकले आणि हे नामनिराळे.
१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मैसूर सहित जिथं जिथं माफिवीरांनी नौकरीसाठी अर्ज दिले होते ती सर्व संस्थाने खालसा झाली.
सर्वच प्लॅन फेल गेले, आयुष्यभर काहीच करू शकलो नाही याचे दुःख मनाला लागले, महात्मांच्या हत्येत असलेला सहभाग पण मनाला खात होता. अशा अवस्थेत १९ वर्ष काढली आणि शेवटी उपवास करून आत्महत्या (प्रायोपवेशन) केली.
इति समग्र माफीवीरस्य कथा समाप्त