Tuesday, 10 November 2015

इमाम बुखारीच्या मुलाचा लव्ह जिहाद

धर्मांधांकडून हिंदू मुलींना लक्ष्य केले जात असताना भाजपाचे सरकार काय करीत आहे?

२0१४ ची लोकसभा निवडणूक झाली, त्या आधी हिंदुत्ववादी संघटनांनी देशात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच तापवला होता. हिंदुंच्या मुली मुसलमान तरुण कशा पळवित आहेत, याची संताप आणणारी वर्णने सोशल मीडियावर प्रसृत केली जात होती. भाजपाची सत्ता आल्यास हे सर्व प्रकार बंद केले जातील, अशीही हवा तयार करण्यात आली होती. तथापि, या सगळ्या बेंडकुळ्या फुकाच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदुत्त्ववाद्यांचे मकुटमनी म्हणून मिरवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या दिल्लीत लव्ह जिहादचे प्रचंड मोठे प्रकरण समोर आले आहे. हिंदुत्त्वादाचा डांगोरा पिटणाºया संघटना मात्र चिडीचूप आहेत.

दिल्लीतील जामा मशिदीचा शाही इमाम सय्यद अहमद बुखारी याचा मुलगा शबन याने एका हिंदू मुलीशी विवाह केला आहे. शबन हा अवघा २0 वर्षांचा आहे. तर त्याची पत्नी बनलेली ही हिंदू मुलगी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील असल्याचे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे. इमाम बुखारीचा मुलगा शबन हा अ‍ॅमिटी विद्यापीठाचा पदवीधर आहे. त्याचे या हिंदू मुलीशी प्रेमसंबंध होते. तथापि, इमाम बुखारीचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मुलगी हिंदू असल्याच्या कारणाने बुखारी लग्नाच्या विरोधात होता, असेही सांगितले जात आहे. तथापि, मुलीने इस्लाम धर्म स्वीकारल्याने बुखारीने लग्नास मान्यता दिली. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मुलीवर दबाव टाकण्यात आल्याचेही वृत्त आहे. इमामाने मात्र या वृत्ताचा अपेक्षेप्रमाणे इन्कार केला आहे. मुलीने राजीखुशीने इस्लामचा स्वीकार केला आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठी जबरदस्ती धर्मांतराचे आरोप होत आहे, असे इमामाने म्हटले आहे.

रविवार दि. ८ नोव्हेंबर २0१५ रोजी दिल्लीतील जामा मशिदीतीच दोघांचा विवाह पार पडला. या लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन) १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीतच होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. धर्मांधांची हिंमत किती वाढली आहे, हेच यावरून दिसते. हा विवाह लव्ह जिहादचाच प्रकार आहे. त्याला मोदी-राजनाथ यांची मान्यता आहे का, हे स्पष्ट व्हायला हवे.

या आधी शबन याचा दस्तारबंदी सोहळा जामा झाला तेव्हा इमामाने मोदी यांना निमंत्रण दिले नव्हते. त्याऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांना निमंत्रित करण्यात आले होते. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी ‘मिया मुशर्रफ’चा घोषा लावून वातावरण तापविले होते. पंतप्रधानपदी बसताच मिया मुशर्रफचे नारे हवेत विरले. मोदींच्या नाकावर टिच्चून नवाज शरिफ दिल्लीत आले. आणि शबनची दस्तारबंदी करून गेले. आताही मोदींच्या नाकावर टिच्चून एका हिंदू मुलीशी शबनचा निकाह लागला आहे. लव्ह जिहादचे नारे लावणारे आता कुठल्या गुहेत दडून बसले आहेत? या देशातील हिंदूंच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार घेणार आहे की नाही?

No comments:

Post a Comment