Showing posts with label विनायक दामोदर सावरकर. Show all posts
Showing posts with label विनायक दामोदर सावरकर. Show all posts

Tuesday, 29 May 2018

समग्र माफीवीरस्य कथा

एटीएम बाबा 
Disclaimer: ही सत्यकथा काल्पनीक आहे याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

माफीवीर यांचे विचार उथळ होते. बलात्काराचे उघड समर्थन कुठलाही विचारवंत करत नाही. त्यांनी तुमच्या बायका मुलींवर बलात्कार केला तर बदला म्हणून तुम्ही पण तेच करा हा सल्ला विचारवंत देत नसतो. असं न करणारे हिंदू हे #बुळगे_हिंदू असतात, असं यांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांचा स्त्रियांबद्दलचा आदर यांच्या दृष्टीने बकवासगिरी होती. आमच्या स्त्रियांना आदर देण्याच्या विनम्रपणाला बुळगे म्हणून यांनी आमच्या भावना दुखावल्यात, आमच्या संस्कृतीची टिंगल टवाळी करणारे असे लोक आमच्यासाठी धर्मद्रोहीच.

शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे #काकतालीय_योग (कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडणे). बरं एवढं सर्व लिहिलं आणि स्वतः काय कार्य करून दिवे लावले तर, इंग्लंडमध्ये पहिल्यांदा ६ महिन्याची शिक्षा भोगली (देशासाठी नव्हे तर... वैयक्तिक कारणास्तव). काहीच जमलं नाही आणि जमवलेले आठ दहा शिष्य पण याच्यावर शंका घेऊ लागल्याने, मदनलाल यास बॉम्ब टाकण्यास उचकवले. मदनलाल हकनाक लटकला.

भारतीयांचा मित्र बनलेल्या जॅक्सनचा खून करण्यासाठी कान्हेरेंना उचकवलं, पिस्तूल दिलं, कान्हेरे लटकले आणि इंग्रजांनी यांना अटक केली. मार्सेलिस बंदरात जहाजाच्या पोर्टहोल मधून वीस फूट उंचीवरून उडी मारली, १० फूट पोहून किनारा गाठला, किनाऱ्यावर ४०० मीटर पळाल्यावर पेस्की या शिपायाने पुन्हा पकडून इंग्रजांच्या हवाली केलं. फ्रांसच्या किनाऱ्यावर (हद्दीतून) भारतीय #गुन्हेगार पकडला गेला म्हणून चार ओळीची बातमी आली आणि नातेवाईकांनी १९४७ नंतर या बातमीचे दाखले देत ही उडी त्रिखंडात गाजवली.

कारागृहात ४ -५ दिवस #कोलू ओढल्यावर कळून चुकलं की हे काम बहुजनांनीच करायचं असतं आपुन के बस की बात नही. नंतर ८ -१० दिवस #काथ्या सुटल्यावर नाजूक हातांना सोसवले नाही, बहुजनांच्या बायकांनीच काथ्या कूट करावी, मेरे हात छिल जायेंगे. हे काम जमलं नाही म्हणून अंधाऱ्या खोलीत कोंडल्यावर माफीनामे सुरु झाले.
तब्बल १० वेळा #माफीनामे लिहून दिल्यावर इंग्रजांनी मरेपर्यंत ब्रिटिश सरकारसाठी काम करायच्या करारनाम्यावर सोडलं, वरून ६० रुपयांची पेन्शन पण सुरु केली.

उडी गाजवलेल्या स्वजातीय नातेवाईकांनी माफीनाम्याची तुलना शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंगाशी केलेल्या तहाशी केली. या महाभागांना माहित नव्हतं का की शिवरायांनी तहात दिलेले किल्ले परत जिंकले. त्यासाठी सिंहासारख्या तानाजींना गमवावे लागले. #शिवरायांशी तुलना करून आमच्या भावना दुखावण्याचा अधिकार यांना कुणी दिला ??
यांनी काय केलं तर मरेपर्यंत ६० रुपयात ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या खबरा पोचवल्या. प्रति सरकारचे क्रांतिकारी नागनाथ अण्णा नायकवाडी यांना इंग्रजांची गोळी खावी लागली, क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांच्या याच प्रति सरकारला हे पत्री सरकार म्हणायचे.

नंतर १९३१ मध्ये स्वतःच स्वतःला #स्वातंत्र्यवीर (भारत १९४७ ला स्वतंत्र झाला, पण हा आधीच तुरुंगातून स्वतंत्र झाल्यामुळे) हि उपाधी जोडून घेतली.

हिंदू महासभेच्या १९३७ सालच्या अहमदाबाद अधिवेशनात द्विराष्ट्र्वादाची संकल्पना सर्वप्रथम यांनीच मांडली. १९४० साली जिनाच्या मुस्लिम लीगने वेगळ्या पाकिस्तानचा ठराव लीगच्या अधिवेशनात मांडला. या दोन्ही वेगळं राहणाऱ्या भावांची युती होणे नैसर्गिकच होतं. या दोन भावांनी फाळणी घडवून आणली जिना प्रत्यक्षपणे तर हे लपून.
फाळणी होईपर्यंत जीनांची मुस्लिम लीग आणि यांची हिंदू महासभा या युतीची सिंध, मुलतान आणि बंगाल या मुस्लिम बहुल भागात संयुक्त सरकारे होती. या सरकारांच्या आश्रयाने या भागांत मुस्लिम लीगने फाळणीच्या समर्थनार्थ दंगली घडवल्या. पण वाचवायला नौखाली मध्ये गांधीजींना जावं लागलं, गांधींनी तिथे जाऊन दंगली शमवून, शांतता प्रस्थापित करून हिंदूंना वाचवले. मुस्लिमांनी गांधींना दिलेला शब्द पाळला.
नपुंसक हिंदू महासभा कुठे होती ?
तिकडे दंगली चालू होत्या आणि इकडे माफीवीर संस्थानिकांना पत्रं पाठवून, प्रत्यक्ष भेटून भारतीय संघराज्यात सामील होऊ नका म्हणून सांगत फिरत होते.

जेथे जेथे हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांची संयुक्त सरकारे होती, तो सर्व भाग पाकिस्तानात गेला. हा निव्वळ योगायोग नव्हे. हा जीनांच्या व्यापक षडयंत्राचा भाग होता. त्यात माफीवीर ही सहभागी होते.
शेवटी काहीच जुळून आलं नाही राजदरबारी नोकरी मिळण्याची शक्यता संपल्याने, कारस्थान करून नाथ्याला महात्माची हत्या करायला साहाय्य केलं, इथेपण नाथ्या आणि नाऱ्या लटकले आणि हे नामनिराळे.
१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि मैसूर सहित जिथं जिथं माफिवीरांनी नौकरीसाठी अर्ज दिले होते ती सर्व संस्थाने खालसा झाली.

सर्वच प्लॅन फेल गेले, आयुष्यभर काहीच करू शकलो नाही याचे दुःख मनाला लागले, महात्मांच्या हत्येत असलेला सहभाग पण मनाला खात होता. अशा अवस्थेत १९ वर्ष काढली आणि शेवटी उपवास करून आत्महत्या (प्रायोपवेशन) केली.

इति समग्र माफीवीरस्य कथा समाप्त

दांभिक सावरकर

"आसिंधुसिंधू भारतभूमिका हि ज्याची पितृभूमी नि पुण्यभू आहे तो हिंदू" अशी हिंदू शब्दाची ची व्याख्या करत बौद्ध, शीख, जैन धर्मियांना "हिंदू" च्या व्याख्येत समाविष्ठ करून घेत सावरकरांनी त्यांना हिंदुत्वाचे अधिकारी जरूर ठरवलं. पण बाबासाहेबानी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मांचा स्वीकार करायचा निर्णय घेतला तेंव्हा मात्र या वीराच्या निधड्या छातीत धडकी भरली. अपचनाचा त्रास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसारखे ते बेचैन झाले आणि बाबासाहेबांवर आपल्या फुसक्या युक्तिवादाच्या टिकाश्त्राने वार करण्यास सुरुवात केली.

आंबेडकरांवर टिका करताना 1956 ला सावरकर लिहतात :
"अस्पृश्यानी हिंदू धर्म सोडू नये भिक्षु आंबेडकरांच्या "थापांना" त्यांनी बळी पडू नये. अस्पृश्यांनी आपल्या स्वतःच्या पूर्वजांना आंबेडकरांच्या नादी लागून पाखंड्यात , पतीतांत किंवा मुर्खात काढू नये. अस्पृश्य हिंदू राहतील तरच अस्पृश्यता अधिक सुलभतेणे नाहीशी होईल." त्यांनी आंबेडकरांच्या निर्णयाचं स्वागत न करता त्यांना थापाडे हिंदुराष्टद्रोही भिक्षु दुष्कर्मी आंबेडकर अशी दुषणे देत टीका केली आहे. केसरी मध्ये ओक्टोम्बर 30, 1956 मध्ये सावरकर लिहतात कि "पूर्वी बौद्धांनी म्लेच्छांशी हातमिळवणी करून म्लेंछे राज्ये भारतात स्थापून हिंदुराष्ट्रद्रोह केला तोच आंबेडकर आज करत आहेत हिंदुराष्ट्राच्या या हितशत्रूंन पासून अखंड सावधान असावे हेच उत्तम, आंबेडकरांच्या या धर्मांतराचे आंधळे कौतुक करू नये"

बाबासाहेब हे बौद्ध धर्माचा स्वीकार करून देखील त्यांनीच दिलेल्या हिंदू व्याख्येप्रमाणे हिंदूच राहणार होते ना? बाबासाहेबांचे आणि त्यांच्यासोबत धर्म परिवर्तन करणारे त्यांचे अनुयायी यांचे पूर्वज देखील प्राचीन काळापासून भारतभूमीतच निवसत आलेच होते ना? त्यामुळे भारतभूमी हीच त्यांची पितृभूमी ठरतच होते कि ? भारत भूमी देखील बौद्धांसाठी पुण्यभूच(holy land) आहे ना? बौद्ध धर्माचा स्वीकारकेल्यामुळं मुस्लिम किंवा इसाई धर्मियांसारखी अरबस्थान किंवा पॅलिसटाइन हि त्यांची पुण्यभू ठरणार तर न्हवतेच ना ? सावरकरांनी दिलेल्या हिंदूंच्या या व्याख्येत बौद्धधर्म पूर्ण फिट होतच होता ना ? त्यामुळे बौद्धधर्मीय पूर्णपणे हिंदुत्वाचे अधिकारी ठरत होतेच ना ? मग सावरकरांना आंबेडकरांचा हिंदू धर्म त्यागाच्या निर्णयाचा विषाद का वाटावा ? त्यांना मिरची लागायचं कारण काय ?

यातून त्या वीराच्या छातीत दडलेला कट्टर सनातनी हिंदू धर्मियच प्रकट झालेला दिसत आहे. हाच तो त्या वीराचा नि हिंदुत्ववाद्यांचा उपयुक्ततावाद मुस्लिम जमातवाद्यांशी लढण्यापुरतेच ते हिंदुत्वाचे अधिकारी इतरवेळी शीख बौद्ध जैन धर्मीय हे वेगवेळे हिंदू न्हवे !

टीप- मुस्लिम आणि इसाई लोकांना फक्त त्यांच्या धर्ममतांमुळे भारतभूमी हि पुण्यभू नाही असं समजणे देखील भारताच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासाला हातभार लावणाऱ्या भारतीय मुस्लिम आणि इसाई धर्मियांचा हा अपमानच आहे. हा अब्दुल कलमांचा अपमान आहे हा भरतभूमिचा रक्षणासाठी शाहिद झालेल्या लढलेल्या प्रत्येक मुस्लिम इसाई जवानांचा, पोलिसांनाच देखील अपमान आहे...
Sagar Waghmare यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Tuesday, 19 January 2016

तर आज देशावर हिंदू महासभेची सत्ता असती

सावरकरांच्या हिंदुत्वावर आरएसएसने कावेबाजपणे मारला डला 

‘द विक’ या इंग्रजी नियतकालिकाने सावरकरांवर विशेषांक काढला आहे. निरंजन टकले यांनी लिहिलेला ‘द लॅम्ब लॉयनाईज्ड’ या शीर्षकाचा मुख्य लेख आणि इतर काही लेख त्यात आहेत. भाजपाचे राज्यसभा सदस्य तरुण विजय यांचाही एक लेख अंकात आहे. ‘द लॅम्ब लॉयनाईज्ड’ या शीर्षकाचा स्वैर अनुवाद ‘सिंह म्हणून सादर करण्यात आलेली एक भित्री शेळी’ असा करता येईल. सावरकरांना झालेली काळ््या पाण्याची शिक्षा, त्यानंतर त्यांनी माफीसाठी इंग्रजांकडे वेळोवेळी केलेले विनंती अर्ज, सरकारने त्यांना माफी देऊन केलेली सुटका आणि त्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारसाठी केलेले कार्य, असा सारा वृत्तांत या लेखात आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा मुख्य हात होता, हा जीवनलाल कपूर आयोगाने काढलेला निष्कर्षही टकले यांनी लेखात विस्ताराने चर्चिला आहे. टकले यांच्या लेखात नवे असे काही नाही. या सर्व बाबी या आधीही अनेक वेळा माध्यमांतून आलेल्या आहेत. वाजपेयी सरकारने सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावले तेव्हा या सर्व बाबींवर विस्ताराने चर्चा झाली होती.  सावरकरांच्या जीवनात अनेक तेजस्वी घटना आहेत, तसे काही कच्चे दुवेही आहेत. सावरकर विरोधक त्यांच्या माफीनाम्याला तसेच नंतर त्यांनी ब्रिटिशांसाठी केलेल्या कामाला हायलाईट करीत राहतात. त्यावर उपाय न चालल्यामुळे  सावरकरवादी या सत्य घटनाचा नाकारित राहतात. सावरकरांच्या चरित्रातील सत्य घटना नाकारल्यामुळे  सावरकरांच्या जीवन चरित्रावरील काळी छाया आणखी गडद होते, हे सावरकर भक्तांना कळत नाही. ते आपला खोटेपणा रेटत राहतात. या गदारोळात सावरकरांचे योग्य मूल्यमापन झालेच नाही.
विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्या कुटुंबियांसमवेतचे छायाचित्र. डावीकडून नारायण सावरकर, गणेश उपाख्य बाबाराव सावकर आणि विनायक सावरकर.
सावरकर हे व्यवहारवादी नव्हते. ते साहसवादी होते. भावनेच्या अधीन होऊन ते निर्णय घेत राहिले. त्याचा तोटा सावरकरांना आयुष्यभर सहन करावा लागला. गांधी हत्येचा डाग लागल्यामुळे ते काँग्रेसच्या टार्गेटवर राहिले. व्यवहारी राजकारण करता न आल्यामुळे त्यांनी स्वत: उभे केलेले हिंदुत्ववादाचे राजकारण त्यांच्या हातून निसटले. हिंदुत्वावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाने केव्हा कब्जा केला हे सावरकरांना कळलेच नाही. पुढे सावरकरांच्या अनुयायांनाही ही बाब नीट आकलन झाली नाही. याचे नीट आकलन झाले असते, तर आज देशावर भाजपा ऐवजी हिंदु महासभेची सत्ता असती.  आरएसएस नियंत्रित भाजपाची सत्ता ही आपलीच सत्ता आहे, असा भ्रम सावरकरवाद्यांनी तसेच हिंदू महासभेच्या नेत्यांनी करून घेतला आहे. त्यातून हे लोक जितके लवकर बाहेर येतील, तितके चांगले आहे.

हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी निर्माण केला. त्याची नीट व्याख्या केली. हिंदुत्वाला राजकीय महत्त्वही मिळवून दिले. तथापि, नंतरच्या काळात आपली सगळी शक्ती त्यांनी महात्मा गांधी यांना विरोध करण्यातच खर्ची घातली. त्यातून गांधी हत्या झाली आणि सावरकर व सावरकरवाद्यांचे राजकारण कायमचे संपले. राष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेमके याच्या उलट केले. गांधींच्या धोरणांना विरोध असला तरी, उघड विरोध करण्याचे धोरण आरएसएसने स्वीकारले नाही. उलट महात्मा गांधी यांना आपल्या प्रात: स्मरणीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिले.  याचा परिणाम असा झाला की, बदनामीचा डाग सावरकर आणि हिंदु महासभेवर आला तर त्यातून राजकीय लाभ रूपी फळ मात्र आरएसएसला मिळाले.

सावरकरांचा हिंदुत्ववाद पळवून आरएसएसने संपूर्ण भारतावर ताबा मिळविला आहे, ही बाब प्रत्यक्ष हिंदुमहासभेचे नेते आणि सावरकरवादी विचारवंत यांच्या अजूनही लक्षात आलेली नाही. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर आरएसएसने त्याच्यापासून स्वत:ला दूर केले. नथुरामचा आरएसएसशी काहीही संबंध नाही, असे आरएसएसच्या वतीने जाहीर करण्यात आले. हा धोरणीपणा हिंदू महासभेला दाखविता आला नाही. महात्मा गांधी यांची हत्या होऊन आता ७0 वर्षे होत आलेली आहेत, तरीही हिंदू महासभेचे लोक सुधारायला तयार नाहीत. मोदी सरकार सत्तेवर येताच नथुराम गोडसेचे पुतळे उभारण्याची भाषा हिंदू महासभेचे नेते करीत आहेत. या मागणीपासूनही आरएसएसने लगेच स्वत:ला दूर केले आहे. मा. गो. वैद्य यांनी खास निवेदन काढून नथुरामचे पुतळे उभारण्याच्या मागणीला विरोध केला. या पासून तरी हिंदू महासभा आणि सावरकरवाद्यांनी काही बोध घ्यायला हवा.