लेखक/संपादक/संकलक : विराज शांताराम

Thursday 3 September 2020

पत्रकारांच्या जीवाची किंमत सासान्य माणसाच्या जीवापेक्षा अधिक आहे का?

‘टीव्ही नाईन’चे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणीही करण्यात येत आहे. कोरोनाने मरणारे रायकर हे देशातील एकटेच व्यक्ती आहेत काय? या क्षणापर्यंत (३ सप्टेंबर २0२0) देशात ६७ हजारांपेक्षा जास्त, तर महाराष्ट्रात २४ हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाने मरण पावले आहेत. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रोज लोक मरत आहेत. रायकरांच्या मरणाचे मोल या सर्वांपेक्षा जास्त आहे काय? चौकशीच करायची असेल, तर या सर्वांच्या मृत्यूची करा. भरपाई द्यायची असेल तर सर्वांनाच द्या.  लोकशाहीत प्रत्येकाच्या जीवाची किंमत एक समान असली पाहिजे. माणूस पत्रकार झाला म्हणून जीवाची किंमत वाढते, आणि शेतकरी झाला म्हणून कमी होते, असे काही आहे काय?

बरे या पत्रकारांनी मागील आठ-नऊ महिन्यांच्या कोरोनाच्या काळात समाजाला उपयोगी पडणारे काही मोठे कार्य केले आहे, असेही नव्हे. कोरोनाने रोज माणसे मरत असताना यांनी मोदी सरकारची गुलामीच केली. लोकांच्या औषध-पाण्याचे विषय कधी लावून धरले नाहीत. मोदींच्या इशाºयावर थाळ््या-टाळ््या, दिवे यांचे महोत्सव साजरे केले. गेले महिनाभर तर सुशांतसिंग राजपूतशिवाय दुसरा विषय यांच्या चॅनलवरून दिसत नव्हता. यासाठी तुम्हाला भरपाई हवी आहे का?

रायकर यांना व्हेंटिलेटर मिळाले नाही, म्हणून रडणाºया हरामखोरांनो, मागील आठ-नऊ महिन्यांपासून व्हेंटिलेटर अभावी रोज लोक मरत आहेत, पण तुम्ही कधी त्यांचा विषय तुमच्या चॅनलवर लावला नाही. तेव्हा तुम्ही सुशांतसिंग केसला हवा देत होता. दुस-यांच्या घरात तरुण मुले मरत होते, तेव्हा तुम्ही थाळ्या-टाळ्याचे कव्हरेज करण्यात मशगुल होता. आता तुमचा एक माणूस गेला तर गळे काढताय काय?

शेजा-याच्या घरातील आग आपल्या घरातही येऊ शकते, याचे भान तुम्हाला राहिले नाही. आता रडू नका. हे तुमच्याच पापाचे फळ आहे.

No comments:

Post a Comment